मुंबई: मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त ९२० चालविणार असून, आजपर्यंत ८२२ गाड्या चालविण्यात आल्या आहेत. याद्वारे १०.८९ लाख प्रवासी प्रवास करतील, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. या गाडयांत पूर्ण वातानुकूलित विशेष, अनारक्षित विशेष आणि वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथून दानापूर, गोरखपूर, वाराणसी, बनारस, प्रयागराज, समस्तीपूर, करीम नगर,मऊ, आगरतळा, आसनसोल, थिविम, कोचुवेली या स्थळांसाठी हे नियोजन आहे. ९२० विशेष गाड्यांपैकी ३५३ सेवा उत्तर प्रदेशसाठी, त्यानंतर २०५ सेवा बिहार, ८४ सेवा गोवा, ३६ सेवा ईशान्य, ७४ सेवा महाराष्ट्रात आणि १६८ सेवा केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा व राजस्थानसाठी आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.-------------छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, नागपूर या प्रमुख स्थानकांवर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या टीमसह गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन केले जात आहे.-------------प्रवाशांना मार्गदर्शनासाठी अनेक स्थानकांवर हेल्प डेस्कची तरतूद-------------उन्हाळी विशेष गाड्यांबाबत वारंवार घोषणा
मध्य रेल्वे ९२० विशेष गाड्या चालवणार
By सचिन लुंगसे | Published: June 18, 2024 9:37 PM