मध्य रेल्वेची ३० दिवसांत ११.२४ कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:35 AM2018-05-02T06:35:20+5:302018-05-02T06:35:20+5:30

अवघ्या ३० दिवसांत ११ कोटी २४ लाखांची कमाई करण्याचा विक्रम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने केला आहे.

Central Railways earns 11.24 crores in 30 days | मध्य रेल्वेची ३० दिवसांत ११.२४ कोटींची कमाई

मध्य रेल्वेची ३० दिवसांत ११.२४ कोटींची कमाई

Next

मुंबई : अवघ्या ३० दिवसांत ११ कोटी २४ लाखांची कमाई करण्याचा विक्रम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने केला आहे. एप्रिल महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ही वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाºयांकडून ८.८७ कोटी इतकी सर्वाधिक दंड वसुली करण्यात आली. गतवर्षी मे महिन्यात ही रक्कम वसूल करण्यात मध्य रेल्वेला यश आले होते. यंदा मात्र, त्याही पुढे जात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनिसांनी एप्रिलमध्येच रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. यंदा एप्रिल महिन्यात १ लाख ९४ हजार ८२२ प्रवाशांकडून ११ कोटी २४ लाख ४८ हजार ७९३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात १ लाख ५४ हजार ६७२ प्रवाशांकडून ८ कोटी ५९ लाख ६४ हजार ७६० रुपयांची वसुली केली होती.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आतापर्यंत केलेली ही रेकॉर्डब्रेक वसुली आहे. प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी केले आहे.

Web Title: Central Railways earns 11.24 crores in 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.