अपघाती मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे मिशन शून्य मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:07 AM2021-09-12T04:07:03+5:302021-09-12T04:07:03+5:30
मुंबई : रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून खाली पडणे, खांबावर आदळणे इत्यादी अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींच्या संख्येवर नियंत्रण ...
मुंबई : रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून खाली पडणे, खांबावर आदळणे इत्यादी अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने मिशन शून्य मृत्यू सुरू केले आहे. अनिलकुमार लाहोटी यांनी मुख्यालयात मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यू आणि जखमींची कमी करण्याऱ्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी संयुक्त समितीची बैठक घेतली आणि कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
संयुक्त समितीच्या सदस्यांमध्ये अभियांत्रिकी, सुरक्षा, सिग्नल आणि दूरसंचार विभागांचे प्रधान विभाग प्रमुख, रेल्वे सुरक्षा विभाग आणि राज्याचे परिवहन आयुक्त यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या प्राधिकरण किंवा संबंधित विभागांकडून जनतेचा मृत्यू कमी करण्याच्या वरील ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य केले जाईल, असे आश्वासन परिवहन आयुक्तांनी आश्वासन दिले.
यावेळी सर्व विभागांच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून खाली पडणे यामुळे होणारे मृत्यू किंवा इजा कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, साध्य केलेले परिणाम आणि भविष्यातील कारवाईचा मार्ग इत्यादी सादर केले. कृती आराखड्यात सीमा भिंती बांधणे, स्थानकांवरील ट्रॅक दरम्यान कुंपण, अधिक पादचारी पूल, सबवे आणि एस्कलेटर, जागरूकता मोहीम, अतिक्रमण करणाऱ्यांच्या मानसिकतेवर प्रभाव पाडण्याच्या वर्तनात्मक पद्धती, असुरक्षित ठिकाणी हुटर्स पुरवण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धती इत्यादींचा समावेश आहे.