मुंबई : मध्य रेल्वेकडून ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वळणासाठी नव्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रुळांना जोडण्यास कळवा आणि दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर विशेष मेगाब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक रविवारी मध्यरात्री दोन ते सोमवारी मध्यरात्री दोनपर्यंत असणार आहे.
मध्य रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकचा लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. १ जानेवारी रोजी २३.५३ पासून ते रोजी २ जानेवारी २३.५२ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत.
पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवले जातील. त्यामुळे लोकल वेळेच्या १०मिनिटे उशिराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंडहून येथून २ जानेवारी रोजी ५.०५ पासून ते ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १.१५ पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत.
या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्दब्लॉकमुळे शनिवार ते सोमवार दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, डेक्कन क्विन ,मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, गदग-मुंबई एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
महापालिका प्रशासनाशी समन्वयप्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका परिवहन उपक्रमाशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था देखील केली आहे.संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथून सुटणाऱ्या लोकल सेवा उपलब्ध नसतील. ब्लॉकनंतर अप आणि डाऊन स्लो मार्गावरील सेवा नव्याने टाकलेल्या अप आणि डाऊन स्लो मार्गावरून रेल्वे फ्लाय ओव्हरद्वारे धावतील आणि मुंब्रा स्टेशनच्या नवीन फलाटांवर थांबतील.