मध्य रेल्वेची चार महिन्यांत साडेआठ हजार कोटींची विक्रमी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 05:48 AM2023-10-15T05:48:25+5:302023-10-15T05:48:34+5:30
मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीत मध्य रेल्वेने ८,५६८.४१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या तिजोरीत एप्रिल- सप्टेंबर २०२३ मध्ये विक्रमी महसूल जमा झाला आहे. या कालावधीत एकूण ८,५६८.४१ कोटी कमावले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरमधील रु. ७,३९५.१८ कोटींच्या तुलनेत १५.८६ टक्के जास्त आहे.
मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीत मध्य रेल्वेने ८,५६८.४१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. गेल्यावर्षी याच कालावधीत ७,३९५.१८ कोटींचा महसूल मिळाला होता. त्यापेक्षा १५.८६ टक्के अधिक आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान मालवाहतुकीतून ६०९.५० कोटींचा महसूल मिळवला. जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील ५७१.०५ कोटी रुपयांच्या तुलनेत ६.७३ टक्के अधिक आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान प्रवासी वाहतुकीतून ५७४.४३ कोटींचा महसूल मिळवला.
पार्किंग, केटरिंग महसुलात घट
मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान विविध महसूल ३३.३१ कोटी मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील ३७.०८ कोटींच्या तुलनेत १०.१७ टक्के कमी आहे. विविध महसुलामध्ये तिकीट भाड्याव्यतिरिक्त महसूल आहे. यामध्ये पार्किंग, केटरिंग, रिटायरिंग रूम इत्यादींमधून मिळणाऱ्या महसुलाचा समावेश असतो. मध्य रेल्वेने उत्पन्नाला चालना देण्यासाठी विभागांनुसार बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स सुरू केलेले आहेत. तिकीट भाड्याव्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी उपक्रम, जाहिराती आणि इतर नावीन्यपूर्ण कल्पनांसह मुख्यालयातील विविध उपक्रमांमुळे महसुलात वाढ झाली आहे.