मुंबई : प्रवाशांना रांगेतून सुटका मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने जीपीएसवर आधारित मोबाइल तिकीट सुरू केले. यासाठी आवश्यक जीपीएस नेटवर्कच्या अडचणींमुळे प्रवासी पुन्हा त्रस्त झाले होते. यावर उपाय म्हणून सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम (क्रिस)ने ‘क्यूआर’कोड स्टिकर कार्यान्वित केले आहे. मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवर ‘क्यूआर’ कोड बसवण्यात आले आहेत. त्यामुळे जीपीएस नेटवर्क नसले तरी प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.तिकिटांच्या रांगेतून सुटका मिळावी म्हणून रेल्वे प्रशासनाने मोबाइल तिकीट सेवा सुरू केली. जीपीएसवर आधारित मोबाइल तिकीट सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोबाइलवरून तिकीट बुक केल्यानंतर तिकिटाच्या प्रिंटसाठी विशिष्ट कोड तयारहोत असे, मात्र जीपीएसचे नेटवर्क येत-जात असल्यामुळे हा कोड मोबाइलवर मिळत नसल्याच्यातक्रारी प्रवाशांकडून क्रिसला प्राप्त झाल्या. यावर उपाय म्हणून स्थानकांवर तिकीट प्रिंट मशीनजवळ ‘क्यूआर’ कोड कार्यान्वित करण्यात आला आहे. तिकीट बुक करून हा कोड स्कॅन केल्यास मोबाइलवर तिकीट येईल. यामुळे नेटवर्क नसले तरी प्रवाशांना ‘क्यूआर’ कोड स्कॅन करून योग्य तिकीट घेत प्रवास करता येणार आहे.प्रवाशांची रांगेपासून होणार सुटका-उपनगरीय रेल्वेमार्गाच्या प्रवाशांसाठी तिकिटांसाठी स्मार्ट कार्ड, पास, तिकीट खिडकी, मोबाइल तिकीट, एटीव्हीएम, ई-तिकीट हे पर्याय उपलब्ध आहेत. जीपीएस नेटवर्कच्या अडचणींमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवर ‘क्यूआर’ कोड चिकटवले आहेत. हे क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशांना त्वरित तिकीट घेऊन प्रवासाला सुरुवात करता येणार असल्याने प्रवाशांची रांगेपासून सुटका होणार आहे. - उदय बोभाटे, महाव्यवस्थापक, क्रिसया स्थानकांत क्यूआर कोड : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण.
मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांत ‘क्यूआर’ यंत्रणा, प्रवाशांची रांगेपासून होणार सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:11 AM