मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 06:13 AM2024-11-09T06:13:24+5:302024-11-09T06:14:36+5:30
Megablock Update: मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ या कालावधीत मेगाब्लॉक राहणार आहे.
मुंबई - मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ या कालावधीत मेगाब्लॉक राहणार आहे. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:४० आणि पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि गोरेगाव अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद गाड्या माटुंगा स्थानकामध्ये धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असल्याने त्या १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तर हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून वाशी/नेरूळ/पनवेलसाठी डाऊन हार्बर सेवा आणि सीएसएमटीवरून वांद्रे/गोरेगावसाठी सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यासोबत काही चर्चगेट - गोरेगाव दरम्यानच्या धिम्या सेवा रद्द होणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे.