राष्ट्रपती पदाचे महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 07:39 PM2023-05-24T19:39:48+5:302023-05-24T19:41:08+5:30

Central Vista Inauguration controversy | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला गैरहजर राहणार

Central Vista Inauguration controversy NCP slams that BJP planning to reduce the importance of the post of President of Indian | राष्ट्रपती पदाचे महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघाती आरोप

राष्ट्रपती पदाचे महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघाती आरोप

googlenewsNext

Central Vista Inauguration controversy: नवीन संसद भवनाचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते व्हावे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सर्वच विरोधी पक्षांनी केली. परंतु राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला न बोलावता पंतप्रधानच नूतन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत. याचा अर्थ भाजपाकडून राष्ट्रपती पदाचे महत्व कमी करण्याचा हा डाव आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

"नागरिकांचे मूलभूत अधिकाऱ्यांचे रक्षण करणे, लोक तांत्रिक व्यवस्थेचे संभाळ करणे व भारतीय सेनेचे सरसेनापती म्हणून कर्तव्य बजावणे हे राष्ट्रपती यांचे कर्तव्य भाजपला माहीत असताना सुद्धा त्यांना डावलून हे उद्घाटन प्रधानमंत्री च्या हस्ते करणे म्हणजे २०२४ ला होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची भाजपची तयारी आहे. देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेल्या व्यक्तीचा हा अपमान आहे ही भूमिका राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना कळवली व त्यानंतर इतर विरोधी पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादीचेही सर्व खासदारांनी सदर उद्घाटन समारंभास न जाण्याचा निर्णय घेतला," असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यावरून राजकारण तापले आहे. 20 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. यामागे वेगवेगळ्या नेत्यांचे आपापले तर्क आहेत. दुसरीकडे, भाजपशिवाय इतर 17 पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. तर सध्या एआयएमआयएम आणि बीआरएसची स्थिती स्पष्ट नाही. मात्र, अशी माहिती समोर येत आहे की, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्षांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यास आमचा पक्ष सहभागी होईल, अन्यथा आम्ही बहिष्कार टाकू, असे म्हटले आहे.

'हे' पक्ष सहभागी होणार!

भाजप व्यतिरिक्त वायएसआर काँग्रेस, बीजेडी, बसपा, एलजेपी, टीडीपी, अपना दल (सोनेलाल), अकाली दल, शिरोमणी अकाली दल (अमृतसर), एजेएसयू, एआयडीएमके, एआययूडीएफ, जेडीएस, मिझो नॅशनल पार्टी, नागा पीपल्स फ्रंट, एनडीपीपी, आरएलपी आणि एसकेएमचे खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पण 20 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.

या २० पक्षांचा बहिष्कार!

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक), जनता दल युनायटेड, आप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), माकप, सपा, राजद, भाकप, इंडियन युनियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फ्रन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, व्हीसीके, एमडीएमके आणि रालोद या पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर संयुक्तपणे बहिष्कार घातला आहे. 

Web Title: Central Vista Inauguration controversy NCP slams that BJP planning to reduce the importance of the post of President of Indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.