Megablock: मध्य, प. रेल्वेवर मेगाब्लॉकला आज सुट्टी, हार्बर मार्गावर कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 08:06 AM2022-08-28T08:06:21+5:302022-08-28T08:06:45+5:30
Megablock: विविध डागडुजीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : विविध डागडुजीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मात्र रविवारी कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव करिताच्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील, तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
ट्रान्स हार्बरवर कुठे?
ठाणे- वाशी/नेरुळ अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी : स. ११.१० ते दु. ४.१०
परिणाम : ब्लॉकदरम्यान ठाणे येथून १०.३५ ते ४.०७ पर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून १०.२५ ते ४.०९ पर्यंत ठाणेकरिता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द असतील.