दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा केंद्राचा डाव - राष्ट्रवादी काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:37+5:302020-12-11T04:24:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांच्या सेवांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. ज्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांच्या सेवांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. ज्या पद्धतीने या क्षेत्रातील निर्णय घेतले जात आहेत त्यातून दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करायचा केंद्र सरकारचा डाव उघड होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
टेलिफोन बुथच्या धर्तीवर वायफाय सेंटर उघडण्याचे धोरण केंद्र सरकार आणत आहे. देशात दूरसंचार विभागांतर्गत बीएसएनएल, एमटीएनएल असली सगळी व्यवस्था ठप्प झाली आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. केंद्र सरकार ही सर्व यंत्रणा एका विशिष्ट कंपनीला देण्याच्या तयारीत आहे. दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करून केंद्र सरकारला नागरिकांचा डाटा गोळा करायचा आहे का? याअगोदर आधारकार्डच्या माध्यमातून डाटा गोळा करून दुरुपयोग करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाल्याचा आरोप मलिक यांनी केला.
.........................