शतकी खेळी : मान्सून १०८ मिमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 03:57 PM2020-08-29T15:57:26+5:302020-08-29T15:57:56+5:30

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अति मुसळधार

Century play: Monsoon 108 mm | शतकी खेळी : मान्सून १०८ मिमी

शतकी खेळी : मान्सून १०८ मिमी

Next
ठळक मुद्देपावसाने या हंगामातला ३ हजार मिलीमीटरचा टप्पा ऑगस्ट महिन्यात पार केला.

मुंबई : मान्सूनने मुंबईच्या मैदानावर शतक ठोकले आहे. कुलाबा वेधशाळेत शनिवारी सकाळी साडे आठ वाजता १०८ मिलीमीटर नोंद झाली असून, पुढच्या २४ तासांत मान्सून मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पाऊस ठिकठिकाणी धो धो कोसळत होता. विशेषतः मुंबईच्या उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. दुपारी २ नंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती.

शुक्रवारी दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने शनिवारीदेखील आपला जोर कायम ठेवला असतानाच भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारी सकाळी ऑरेंज अलर्ट जारी केला. त्यानुसार, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात, गोवा आणि कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला. हवामान खात्याने इशारा दिला असतानाच मुंबईत देखील ब-यापैकी पावसाने आपला मारा कायम ठेवला; आणि दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी अंधारून आलेल्या वातावरणात पावसाने दमदार बरसात केली. दुपारी २ वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. मात्र नंतर त्याने विश्रांती घेतली होती.
----------------

- मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढला.
- मुंबईच्या पावसाने या हंगामातला ३ हजार मिलीमीटरचा टप्पा ऑगस्ट महिन्यात पार केला आहे.
- शनिवारी दुपारी वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, सायन, अंधेरी-साकीनाका, कमानी जंक्शन, घाटकोपर, पवई येथे पावसाने रौद्र स्वरुप धारण केले होते.
- मुंबईच्या उपनगरात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला पाऊस काही मिनिटे धो धो कोसळत होता.
----------------

पाऊस/मिमी
कुलाबा १०८
सांताक्रूझ ८५.४
----------------

पाऊस/मिमी
शहर ८६.८३
पूर्व उपनगर ८२.७२
पश्चिम उपनगर ६०.५३
----------------

२८ ऑगस्ट पर्यंतचा पाऊस
कुलाबा २ हजार ८१६.१ मिमी
सांताक्रूझ ३ हजार ३८.५ मिमी
----------------

टक्केवारी
कुलाबा १२२.८७
सांताक्रूझ ११३.८९

----------------
जलसाठा : टक्के
२०२० : ९६.५१
२०१९ : ९६.५३
२०१८ : ९५.२७

----------------

३ ठिकाणी बांधकाम कोसळले
९ ठिकाणी झाडे पडली
१० ठिकाणी शॉर्टसर्किट झाले

 

Web Title: Century play: Monsoon 108 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.