मुंबई : राज्य शासनाने अनाथ बालकांना नोकºयांमध्ये एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक प्रमाणपत्र घेण्यासाठी मुंबई शहरातील अनुदानित, विनाअनुदानित बालगृहांतून बाहेर पडलेल्या बालकांनी आपापल्या संस्थांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मुंबई शहर जिल्ह्यातील बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियामांतर्गत मान्यता प्राप्त असलेल्या अनुदानित, विनाअनुदानित संस्था मध्ये पूर्वी दाखल झालेल्या अनाथ बालकांनी शेवटच्या संस्थेत वास्तव्यास असलेल्या संस्थेशी तात्काळ संपर्क साधून अनाथ असल्याबाबत प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियामांतर्गत मान्यता प्राप्त असलेल्या अनुदानित, विनाअनुदानित संस्था मध्ये दाखल होणाºया अनाथ मुलांना संस्थेमधून बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. अशा लाभार्थ्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आयुक्तालय, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरुन वितरित करण्यात येईल. तसेच बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ प्रवेशितास शेवटच्या संस्थेत वास्तव्यास असेल अशा संस्थेकडे अनाथ प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
अनाथांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:46 AM