सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक झाले जाहीर; १८ मार्च ते २३ जुलैदरम्यान होणार पेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:51 AM2023-01-09T06:51:14+5:302023-01-09T06:51:26+5:30

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा ९ ते २० मे दरम्यान घेण्यात येणार आहे.

CET Exam Schedule Announced; The paper will be held from 18th March to 23rd July | सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक झाले जाहीर; १८ मार्च ते २३ जुलैदरम्यान होणार पेपर

सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक झाले जाहीर; १८ मार्च ते २३ जुलैदरम्यान होणार पेपर

Next

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच कला, कृषी, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण या विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात घेणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १८ मार्च ते २३ जुलै या कालावधीत विविध टप्प्यांवर ‘सीईटी’ परीक्षा होणार आहेत. 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा ९ ते २० मे दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध अभ्यासक्रमांच्या जवळपास २० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या विविध सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक रविवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या जेईई, नीट, सीयुईटी, यूजीसी नेट, अशा विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. या सर्व परीक्षांसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सीईटी सेलने  परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले.

अभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा ९ ते १३ मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी १५ ते २० मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी १ एप्रिलला, तर एलएलबी (३ वर्ष) यासाठी २ व ३ मे रोजी परीक्षा होणार आहे.

Web Title: CET Exam Schedule Announced; The paper will be held from 18th March to 23rd July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.