सीईटीला मिळाला 15 सप्टेंबरचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:27 AM2021-09-08T07:27:34+5:302021-09-08T07:28:07+5:30
नोव्हेंबरमध्ये सुरू होणार व्यावसायिक महाविद्यालये
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील यंदाचे शैक्षणिक वर्ष २ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. याच तारखेपासून व्यावसायिक महाविद्यालये सुरू करण्याचा मानस असून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत ऑफलाइन की ऑनलाइन, याचा निर्णय घेतला जाईल. तसेच सर्व अभ्यासक्रमांसाठी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत सीईटी परीक्षा घेतली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
मंत्रालयात बोलताना सामंत यांनी सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेतली जाणार आहे. निकाल २० ऑक्टोबरपर्यंत जाहीर केले जातील.
या सीईटी परीक्षांसाठी तब्बल ५० हजार संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ८६ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार तर १४ टक्के विद्यार्थ्यांना उर्वरित विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निवडण्यात आली असल्याचेही सामंत म्हणाले.
सीईटी परीक्षांच्या तारखा
१५ सप्टेंबर २०२१
एमसीए, मास्टर ऑफ हाॅटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बीए, बीएसस्सी, बीएड
१६,१७ आणि १८ सप्टेंबर २०२१
मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशनसाठी शारीरिक चाचणी (ऑफलाइन पद्धतीने), एमबीए, एमएमएस
२० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१
बीई आणि बीटेक, बीफार्म, कृषी आणि संबंधित अभ्यासक्रम
३ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ हाॅटेल मॅनेजमेंट, एम.एड., बी.एड. आणि एम.एड. (३ वर्षे एकत्रित अभ्यासक्रम), विधी (पाच वर्षे अभ्यासक्रम), बीपीएड
४,५,६ आणि ७ ऑक्टोबर
बीपीएड (शारीरिक चाचणी - ऑफलाइन)
४ आणि ५ ऑक्टोबर
विधी (तीन वर्षांचा अभ्यासक्रम)
६ आणि ७ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल ॲन्ड स्पेशल
९ आणि १० ऑक्टोबर
बॅचलर ऑफ फाइन आर्ट
निकाल : २० ऑक्टोबरपर्यंत सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर केले जातील.
३५% पेक्षा कमी गुण; तरी प्रवेशास पात्र
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुणांचा निकष निर्धारित केला आहे.
त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण नाहीत म्हणून, महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गतच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.