उरण : केंद्राच्यापाच सीएफएसपैकी (कंटेनर फ्रेट स्टेशन) खासगी मालकांना दिलेले चार सीएफएस प्रचंड नफ्यात तर केंद्र सरकार चालवत असलेला सीएफएस प्रचंड तोट्यात चालत आहेत. याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी उरण येथे पत्रकार परिषदेत दिली.उरण परिसरात केंद्राच्या मालकीच्या सीएफएसचे कामकाज पाहण्यासाठी व त्याची माहिती घेण्यासाठी गुरुवारी (दि.१) केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पासवान यांनी भेट दिली. केंद्राच्या मालकीच्या पाच सीएफएसपैकी खासगी मालकांना दिलेले चार सीएफएस प्रचंड नफ्यात तर केंद्र सरकार चालवित असलेला सीएफएस प्रचंड तोट्यात चालत असल्याची बाब निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पासवान यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा हेल्पलाईनवर करणे शक्य होणार असल्याची माहिती पासवान यांनी दिली.(वार्ताहर)ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी योजनाऊस कारखानदारांकडे ऊस शेतकऱ्यांची ३१ मे २०१४ सालापर्यंत १४ हजार ९५ कोटींची थकबाकी होती. केंद्र सरकारने ऊस उत्पादकांची थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्यामुळे थकबाकी १५ डिसेंबर २०१४ पर्यंत तीन हजार ५६७ कोटींपर्यंत घटली आहे. संगणकीकरणच्भारतीय खाद्य निगमचे कामकाजाचे संगणकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. च्निगमच्या कामकाजात असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. गोदामे आॅनलाईन करण्यासाठी आॅनलाईन डेपो सिस्टीमचाही विचार सुरू आहे.
‘सीएफएस’ची चौकशी करणार
By admin | Published: January 02, 2015 2:04 AM