मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल; चंद्रपूरमध्ये सर्वात कमी  १० अंश सेल्सिअस तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:35 AM2020-11-09T01:35:48+5:302020-11-09T06:58:01+5:30

शनिवारी मात्र मुंबई थेट १९ अंशांवर घसरली होती

Chahul pink cold in Mumbai; The lowest temperature in Chandrapur is 10 degrees Celsius | मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल; चंद्रपूरमध्ये सर्वात कमी  १० अंश सेल्सिअस तापमान

मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल; चंद्रपूरमध्ये सर्वात कमी  १० अंश सेल्सिअस तापमान

Next

मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात गुलाबी थंडीचे आगमन झाले असून, रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.

पुणे, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी, अकोला, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि वर्धा येथील किमान तापमान रविवारी १५ अंशांखाली नोंदविण्यात आले, तर मुंबईचे किमान तापमान २३ अंशांच्या आसपास हाेते. शनिवारी मात्र मुंबई थेट १९ अंशांवर घसरली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव आणखी वाढेल आणि किमान तापमान एक आकडी नोंदविण्यात येईल.

Web Title: Chahul pink cold in Mumbai; The lowest temperature in Chandrapur is 10 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई