कुपोषणाचा जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला आढावा
By admin | Published: November 3, 2014 11:03 PM2014-11-03T23:03:41+5:302014-11-03T23:03:41+5:30
तालुक्यात काही दिवसापूर्वी कळंब येथे एका कुपोषित बालकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर कुपोषणाबाबत अधिक आकडेवारी पुढे आल्यानंतर कर्जत तालुका कुपोषणाबाबत आघाडीवर असल्याचे दिसून आले
कर्जत : तालुक्यात काही दिवसापूर्वी कळंब येथे एका कुपोषित बालकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर कुपोषणाबाबत अधिक आकडेवारी पुढे आल्यानंतर कर्जत तालुका कुपोषणाबाबत आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्याची दखल घेवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे कर्जत तालुक्यातील असल्याने येथील कुपोषणाचा विषय हा त्यांच्यासाठी संवेदनशील विषय बनला आहे. त्यात वाढत्या कुपोषणासोबतच कुपोषित बालकाचा मृत्यू झाला असल्याने हा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ नये, यासाठी कर्जत तालुक्यातील कुपोषणाबाबत अधिकाऱ्यांची बैठक कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती वर्षा मुकादम, अशोक थुले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.