- अतुल कुलकर्णी मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येभाजपाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. तळ्यात मळ्यात विरोध करणाऱ्या या पक्षांनी आता तरी विरोधकांची भूमिका भक्कमपणे निभावली, तर लोकसभा निवडणुकीत राज्यातही वेगळे चित्र दिसू शकेल. मात्र, आमचे नेते आयत्या वेळी कसे वागतील कोणास ठाऊक, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.धुळे महापालिकेत भाजपाने मिळविलेले यश आजच्या निकालांनी झाकोळले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेवाराला निवडून आणण्याची वेळ भाजपावर आली होती. राज्य विधानसभेत भाजपाचे १२२ आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादीतून आयात केलेले आमदार बदलत्या स्थितीत भाजपात किती काळ राहतील, याची चर्चा सुरूच झाली आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीने चार वर्षांत विरोधक म्हणून स्वत:ची जागा तयार न केल्याने ती जागाही शिवसेनेनेच घेतली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कोणते विषय कोणी मांडायचे, यावरून सभागृहात सख्य दिसत नव्हते. राज्यात पक्षाचे नेतृत्व कोणी करायचे, यावरून या दोघांशिवाय प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातही एकवाक्यता दिसली नाही. जी स्थिती काँग्रेसची ती राष्ट्रवादीची, पण आजच्या निकालाने या दोन्ही पक्षांना एकदम बळ मिळाले आहे.जे नको ते नाकारलेचार राज्यांतील मतदारांनी पर्याय कोण, या फालतू प्रश्नात न पडता, जे नकोत त्यांना नाकारले आहे. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस असते, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. देशाला दाखविलेली ही दिशा आहे.- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखही तर चपराकया निवडणुकांचे निकाल म्हणजे मोदी-शहांच्या जुलमी राजवटीला जनतेने दिलेली चपराक आहे. त्याबद्दल जनतेचे अभिनंदन. भाजपाची उलटी गिनती सुरू झाली आहे. भाजपावर ही वेळ येणारच होती. हा निकाल म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या निकालाची नांदी आहे.- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनानिवडणूक निकालाने भाजपा केंद्रित विरोधाचा मुद्दाच शिल्लक ठेवला नाही. प्रादेशिक पक्षांच्या आकांक्षा पल्लवीत झाल्या. त्यांच्या नेत्यांनाही पंतप्रधान पदाची संधी असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. त्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी देशात सुरू केलेल्या महाआघाडी निर्मितीमध्ये बिघाड होऊ शकतो.- अॅड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली पक्षाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांत विजयी पुनरागमन केले आहे. सेक्युलॅरिझम व लोकशाही तत्वांशी असलेली काँग्रेसची बांधिलकी यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाली. १०० वर्षाहून अधिक काळ काँग्रेसने जी मूल्ये या देशात रुजवली त्यांचा विजय झाला आहे. त्याबद्दल काँग्रेस नेतृत्व व पक्षाचे कार्यकर्ते यांचे मी अभिनंदन करतो. राहुल गांधी यांनी आपले नेतृत्व व अधिकार पुन्हा सिद्ध केला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी मी त्यांना व काँग्रेस पक्षाला सुयश चिंततो.- विजय दर्डा, चेअरमन,लोकमत एडिटोरियल बोर्ड व राज्यसभेचे माजी सदस्यकाँगे्रस का जिंकली, यापेक्षा आपण का हरलो, याचे आत्मपरीक्षण भाजपा व घटक पक्षांनी करण्याची गरज आहे. भाजपाच्या विजयरथाला खीळ बसली आहे.- खा. संजय राऊत, शिवसेना नेतेकाँग्रेसच्या जबरदस्त पुनरागमनाचे संकेत!पाच राज्यांचे निकाल म्हणजे देशात काँग्रेसच्या जबरदस्त पुनरागमनाचे संकेत आहेत. मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी, अल्पसंख्याक समाजाचे मोदी सरकारविरुद्धचे हे मत होय. हा दुग्धशर्करा योगच. कारण आजच्या दिवशीच एक वर्षापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. या विजयाबद्दल काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.- राजेंद्र दर्डा, माजी मंत्री, महाराष्ट्रमोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है, हाच संदेश जनतेने आजच्या निकालाच्या माध्यमातून हुकूमशहा नरेंद्र मोदी यांना ऐकविला आहे. काँग्रेसच्या विजयाने भाजपाची घरवापसी निश्चित केली आहे. मोदी लाट ओसरली आहे. फडणवीस सरकारचेही अवघे काही महिने राहिले आहेत. - खा. अशोक चव्हाण,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
पाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 5:43 AM