दोन आठवडे चैतन्यधारा; राज्याला दिलासा; बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 07:35 AM2023-09-10T07:35:41+5:302023-09-10T07:36:15+5:30

मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे. 

Chaitanyadhara for two weeks; Relief to the State; Baliraja was happy | दोन आठवडे चैतन्यधारा; राज्याला दिलासा; बळीराजा सुखावला

दोन आठवडे चैतन्यधारा; राज्याला दिलासा; बळीराजा सुखावला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांत मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मराठवाड्यासह अपेक्षित ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पुढील दोन ते तीन आठवडे सक्रिय राहणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, पाण्याच्या साठ्यात वाढ होईल, तर दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांतही दमदार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे. 

मान्सून पुन्हा सक्रिय
पुढील दोन ते तीन आठवडे राज्याच्या काही भागांसह देशातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

Web Title: Chaitanyadhara for two weeks; Relief to the State; Baliraja was happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.