विरारमध्ये छेडछाडीला विरोध करणा-या १० वीच्या मुलीवर चाकूहल्ला
By admin | Published: July 20, 2015 11:59 AM2015-07-20T11:59:48+5:302015-07-20T11:59:48+5:30
मुंबईलगतच्या विरार येथे छेडछाडीला विरोध करणा-या १० वीच्या विद्यार्थिनीवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने चाकूहल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
विरार, दि. २० - मुंबईलगतच्या विरार येथे छेडछाडीला विरोध करणा-या १० वीच्या विद्यार्थिनीवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने चाकूहल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे.
विवार पूर्व येथील नाना नानी पार्क परिसरात राहणारी मुलगी सोमवारी सकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत जायला निघाली होती. या दरम्यान चार ते पाच जणांच्या टोळक्याने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे भयभीत झालेली मुलगी पुन्हा घरी परतायला निघाली. हल्लेखोरांनी तिला तिच्या इमारतीखालीच गाठले व तिच्यावर चाकूने हल्ला करुन घटनास्थळावरुन धूम ठोकली. काही दिवसांपूर्वी मुलीने छेडछाड करणा-याच्या श्रीमुखात लगावली होती व याच रागातून तिच्यावर चाकूहल्ला झाला असा आरोप पिडीत मुलीच्या आईने केला आहे.