Join us

चाकरमानी निघाला गावाला; एसटी बस हाऊसफुल्ल

By सचिन लुंगसे | Published: March 20, 2024 6:29 PM

मुंबई महानगर प्रदेशातून दररोज राज्यभरात १ हजार ५०० हून अधिक एसटी बस सोडल्या जातात. पुढील तिन्ही दिवसांसाठी कोकणात जाणा-या सगळ्या एसटी बस हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

मुंबई : होळीसाठी गावाकडे जाणा-या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेप्रमाणे आता एसटी महामंडळाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली असून, राज्यतभरात जाणा-या सुमारे १५०० हून अधिक नियमित एसटी बस हाऊसफुल्ल झाल्यात आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्हयांतून या सगळ्या एसटी बस सुटणार असून, अधिकाधिक एसटी बस कोकणात जाणा-या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.मुंबई महानगर प्रदेशातून दररोज राज्यभरात १ हजार ५०० हून अधिक एसटी बस सोडल्या जातात. पुढील तिन्ही दिवसांसाठी कोकणात जाणा-या सगळ्या एसटी बस हाऊसफुल्ल झाल्या आहेत. यातील काही एसटी बसचे ग्रुप बुकिंग असून, उर्वरित एसटी बस आरक्षण झालेल्या आहेत. कोकण शिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे जाणा-या नियमित एसटी बस हाऊसफुल झाल्या आहेत. या शिवाय मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरु नगर, बोरीवली नॅन्सी कॉलनी, खोपट, ठाणे या बस स्थानकांहून नियमित सुटणा-या दीड हजार बसचे आरक्षण फुल झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.२० ते २५ मार्चविभाग / ग्रुप बुकिंग / आरक्षणमुंबई / ४३ / ५१ / ९४पालघर / ३५ / १४ / ४९ठाणे / २४ / १०८ / १३२एकूण / १०२ / १७३ / २७५

टॅग्स :मुंबई