गटबाजी रोखण्याचे भाजपासमोर आव्हान

By admin | Published: September 2, 2014 01:37 AM2014-09-02T01:37:45+5:302014-09-02T01:37:45+5:30

कांदिवली पूर्वेपासून जोगेश्वरीर्पयत अवाढव्य पसरलेल्या मालाड मतदारसंघावर 199क् पासून शिवसेनेचे वर्चस्व अबाधित होते.

Challenge before the BJP to stop gambling | गटबाजी रोखण्याचे भाजपासमोर आव्हान

गटबाजी रोखण्याचे भाजपासमोर आव्हान

Next
गौरीशंकर घाळे - मुंबई
कांदिवली पूर्वेपासून जोगेश्वरीर्पयत अवाढव्य पसरलेल्या मालाड मतदारसंघावर 199क् पासून शिवसेनेचे वर्चस्व अबाधित होते. गजानन कीर्तिकर येथून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2क्क्9 साली मतदारसंघ पुनर्रचनेत या अवाढव्य मतदारसंघाचे विभाजन झाले आणि मालाडच्या ऐवजी दिंडोशी आणि कांदिवली पूर्व असे दोन मतदारसंघ अस्तित्वात आले. युतीच्या जागावाटपात दिंडोशी शिवसेनेकडे तर कांदिवली भाजपाच्या वाटय़ाला आले. निवडणुकीत मात्र या दोन्ही मतदारसंघांतून काँग्रेस उमेदवारांनी बाजी मारली. 
कांदिवली पूर्व मतदारसंघाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. मालाड पूर्वेचे 3 वॉर्ड आणि कांदिवली पूर्वेतील 3 वॉर्डाचा या मतदारसंघात समावेश होतो. 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रमेश ठाकूर यांनी येथून 12 हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळविला. ठाकूर यांना एकूण 5क् हजार 138 मते मिळाली. त्यांच्या विरोधातील भाजपा उमेदवार जयप्रकाश ठाकूर यांनी 38 हजार 832 मते घेतली. तर 
मनसे उमेदवार विनोद पवार यांना तिस:या क्रमांकाची 24 हजार 91 मते मिळाली. 
रमेश ठाकूर 1992 साली पहिल्यांदा कांदिवलीतून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997, 2क्क्2 आणि 2क्क्7 असे सलग चार वेळा  ते नगरसेवक बनले. याचा लाभ त्यांना 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत झाला. उत्तर भारतीय मतांवरील मदार, ठाकूर कुटुंबाच्या राजकीय पाश्र्वभूमीमुळे अनुकूल वातावरण, मनसेमुळे झालेली मतांची विभागणी आणि जोडीलाच ऐन वेळी भाजपातील अंतर्गत गटबाजीने उचल खाल्ल्याने रमेशसिंग ठाकूर यांचा विजय सुकर झाला. यातील काही बाबी आगामी विधानसभा निवडणुकीतही तशाच कायम राहणार असल्याने ठाकूरांना त्याचा लाभ होणार आहे. मात्र, गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार म्हणून ठाकूरांना विशेष कामगिरी करता आली नाही. संपूर्ण विभागातील मतदारांशी संपर्क कमी पडल्याची तक्रार आहे. त्यातच काही काळापूर्वी स्वत: ठाकूरांनी भाजपा प्रवेशाची पडद्याआडून चाचपणी केल्याची चर्चा स्थानिक राजकीय वतरुळात सुरू होती. पण ही चर्चा इथेच थांबली. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रमेशसिंग ठाकूरांची उमेदवारी नक्की असून त्यांनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. 
दुसरीकडे भाजपाच्या संभाव्य उमेदवारांनीही आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक तर भाजपाचे चार नगरसेवक आहेत. चार नगरसेवक आणि मजबूत संघटन या बाबी भाजपाच्या दृष्टीने एकाच वेळी जमेची आणि अडचणीची बाब बनली आहे. 2क्क्9 सालीदेखील हा मतदारसंघ भाजपासाठी अनुकूल होता आणि भाजपा उमेदवारच निवडून येणार, अशी चर्चा होती. परंतु पक्षांतर्गत गटबाजीमुळे ऐनवेळी भाजपाने आपला उमेदवार बदलला. अतुल भातखळकरांच्या ऐवजी जयप्रकाश ठाकूरांना उमेदवारी मिळाली. ऐनवेळी उफाळून आलेली गटबाजी रोखण्यात शिस्तबद्ध भाजपाला यश आले नाही आणि जयप्रकाश ठाकूरांना पराभवाच्या रूपाने त्याची किंमत मोजावी 
लागली.
 यंदाही अतुल भातखळकर, नगरसेवक विनोद शेलार अशी नावे चर्चेत आहेत. प्रदेश प्रवक्ते असणा:या भातखळकरांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील संपर्क कायम राखल्याने त्यांचे नाव आघाडीवर असले तरी अद्याप उमेदवाराबाबत अनिश्चितता पाहायला मिळते. पक्ष संघटनेतील कुरबुरी वेळीच दूर केल्या तरच भाजपा उमेदवाराचा मार्ग सुकर होणार आहे. अन्यथा 2क्क्9 ची पुनरावृत्ती पाहायला मिळेल, अशी भावना स्थानिक भाजपा कार्यकर्ते व्यक्त करतात. 
मनसे उमेदवार विनोद पवार यांनी येथून 24 हजार मते घेतली. यंदा  मराठी मतांची मोठय़ा प्रमाणावर विभागणी होण्याची शक्यता नाही. पवारांच्या जागी महेश फरसकर यांच्याकडे विभागप्रमुखपद सोपविण्यात आले. तर अखिलेश चौबे यांनी दोन वर्षापासून मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे.
 मनसेचा चेहरा म्हणून ते पुढे आले असले तरी मनसेकडून उत्तर भारतीय व्यक्तीला उमेदवारी मिळणार का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. चौबे यांना उमेदवारी मिळाल्यास उत्तर भारतीय मते मनसेकडे वळण्याची शक्यता असून त्याचा रमेशसिंग ठाकूरांना फटका बसण्याची शक्यता आहे.  एकूणच भाजपातील अंतर्गत गटबाजी, मनसेचा उत्तर भारतीय उमेदवार यावरच कांदिवली पूर्वेचा निकाल अवलंबून असणार आहे.  (प्रतिनिधी)
 
च्धानजी वाडी, हनुमान नगर, मकरणी पाडा आदी परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा 
प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. दफ्तरी रोड, दत्त मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणावर विकाकामे सुरू असून वाहतुकीचा प्रश्न जटिल बनला आहे.
 
च्हनुमान नगर-आकुर्ली रोड, कांदिवली पूर्वेची लोखंडवाला परिसरातील वाहतूककोंडी मतदारांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न बनली आहे. खराब रस्ते, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच आरोग्याचा प्रश्न मतदारसंघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

 

Web Title: Challenge before the BJP to stop gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.