दोनशे रस्ते पूर्ण करण्याचे आव्हान

By admin | Published: May 27, 2017 02:34 AM2017-05-27T02:34:39+5:302017-05-27T02:34:39+5:30

खडीचा पुरवठा बंद झाल्यामुळे रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्यास शेवटचे पाच दिवस उरले आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार सुमारे दोनशे रस्त्यांची कामे शिल्लक आहेत

The challenge to complete two hundred roads | दोनशे रस्ते पूर्ण करण्याचे आव्हान

दोनशे रस्ते पूर्ण करण्याचे आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: खडीचा पुरवठा बंद झाल्यामुळे रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्यास शेवटचे पाच दिवस उरले आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार सुमारे दोनशे रस्त्यांची कामे शिल्लक आहेत. मात्र रस्त्यांना प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात आलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील, असा प्रशासनाचा दावा आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील बहुसंख्य रस्त्यांची कामे खडीअभावी खोळंबली आहेत. मुसळधार पाऊस झाल्यास रस्त्यांची दुरवस्था होईल, मुंबईकरांना त्याचे परिणाम सहन करावे लागतील. त्यामुळे नगरसेवकांवर टीका होण्याच्या भीतीने रस्त्यांची दुरुस्ती कामे तातडीने आणि मुदतीत पूर्ण करावीत, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
मुंबईतील रस्त्यांच्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती कामांचा प्रस्ताव शुक्रवारी समितीच्या मंजुरीसाठी पटलावर मांडण्यात आला. दादर पूर्व व पश्चिम विभागातील एकूण १९ रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावावर हरकत घेऊन नगरसेवकांनी त्यांच्या विभागातील रस्त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला.

Web Title: The challenge to complete two hundred roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.