मुंबई : पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा वाढविलेला सेवाकाल निहमबाह्य असल्याचा आरोप करत अॅड. आर.आर. त्रिपाठी यांनी पडसलगीकर यांच्या सेवाकाल मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.पडसलगीकर यांचा कार्यकाल आॅगस्टमध्ये संपुष्टात येणार होता. मात्र, राज्य सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ती नोव्हेंबरमध्ये संपत होती. त्याआधीच पुन्हा सरकारने त्यांना तीन महिन्यांनी मुदतवाढ दिली. ती फेबु्रवारी अखेरीस संपेल. मुदतवाढ नियमबाह्य असून ती रद्द करावी, मुदतवाढ देणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी विनंती त्रिपाठी यांनी याचिकेत केली.
पोलीस महासंचालकांच्या मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:57 AM