ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 02:33 AM2018-09-10T02:33:05+5:302018-09-10T02:33:09+5:30

मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असताना, त्यातून निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही.

Challenge of disposal of e-waste | ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचे आव्हान

ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचे आव्हान

Next

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असताना, त्यातून निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये शहरात वाढत असलेला ई-कचरा, इलेक्ट्रॉनिक व जैविक कचºयाच्या रूपाने नवे आव्हान महापालिकेपुढे उभे राहिले आहे.
घरोघर जाऊन कचरा संकलन करण्याला प्राधान्य देण्यात येत असले, तरी मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाºया ठिकाणी कचरा संकलन डबे आवश्यकतेनुसार बसवावेत व वेळच्या वेळी रिकामे करावेत, असे आदेश आयुक्तांनी अधिकाºयांना दिले आहेत, तसेच मंडईतील ओल्या कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रयोगही महापालिकेने केला. मात्र, प्रकल्पाला जागाच मिळालेली नाही.
अन्यथा कचरा उचलणे बंद
महापालिकेच्या कलम ३६८ अंतर्गत नियमांचे पालन न करणाºया सोसायट्यांचा कचरा उचलणे बंद केला जाऊ शकतो. दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाºया अथवा २० हजार चौ. मी. क्षेत्रफळावर असलेल्या सोसायट्यांना हा नियम लागू आहे.
कायदेशीर कारवाई
नियम न पाळणाºया सोसायट्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. एमआरटीपी कायद्यांतर्गत कलम ५३ (१) अनुसार सोसायट्यांच्या पदाधिकाºयांना पाच हजार दंड किंवा दोन वर्षांचा कारावास अशा शिक्षेला सामोरे जावे लागेल.
वीजनिर्मिती केवळ स्वप्नच
दादर येथील मीनाताई ठाकरे फूल मंडईत तयार होणाºया ओल्या कचºयापासून फूल मंडईच्या पाठीमागील मलनिस्सारण प्रचालन खात्याच्या जागेत सुमारे ८०० युनिट प्रतिदिन वीजनिर्मिती करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रमोद महाजन उद्यान, फूल मंडई, मासळी बाजार, दादर यानगृह व दादर मलप्रक्रिया केंद्र प्रकाशमय करणार होती. मात्र, या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा देण्यास मलनिस्सारण प्रचालन विभागाने नकार दिला आहे.
ठेकेदाराच्या मुसक्या आवळल्या
जादा कमाई करण्यासाठी डेब्रिज भरून कचºयाचे वजन वाढविणाºया ठेकेदारांना महापालिकेने रंगेहाथ पकडले. त्यानंतर कचºयाचे प्रमाण कमी झाले आहे.

Web Title: Challenge of disposal of e-waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.