जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान

By Admin | Published: March 17, 2016 01:11 AM2016-03-17T01:11:21+5:302016-03-17T01:11:21+5:30

बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेल्या विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे या तीन नगरसेवकांच्या जामिनाला ठाणे

Challenge in Jamuna High Court | जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान

जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान

googlenewsNext

ठाणे : बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेल्या विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे या तीन नगरसेवकांच्या जामिनाला ठाणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याबाबतची परवानगी राज्याच्या विधि विभागाकडून मिळाल्यानंतर ही याचिका दाखल केली आहे. एकीकडे राज्य शासनाने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी कंबर कसल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
मुल्ला यांच्या जामिनाला पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्यापाठोपाठ २३ फेब्रुवारी २०१६ रोजी तिघांचीही ठाणे न्यायालयाने ७८ दिवसांनी जामिनावर सुटका केली. मुल्ला यांच्याप्रमाणेच तिघांच्याही जामिनाला आव्हान देण्याची राज्याच्या विधि विभागाकडे ठाणे पोलिसांनी परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर सुधाकर चव्हाणांसह तिघांच्याही जामिनाला आता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असून अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची निर्मिती केली आहे. ते जामिनावर मुक्त असल्याने तपासात बाधा येऊ शकते. या प्रकरणातील साक्षीदार, तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेवक भूमिगत झाले होते. त्यांचे मोबाइल नॉट रिचेबल होते. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, या कलमासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल आहे. त्यामुळे चौघांच्याही संपत्तीची चौकशी सुरू आहे. नगरसेवक कारकिर्दीपासूनची त्यांची बँक खातीही पडताळली जात आहेत. असे अनेक मुद्दे जामिनाला आक्षेप घेताना मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Challenge in Jamuna High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.