Join us  

लोकलसेवा सुरळीत ठेवण्याचे आव्हान

By admin | Published: May 27, 2016 4:24 AM

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला झोडपून काढणारा पावसाळा तोंडावर आला असला तरीदेखील येथील नालेसफाईची कामे अद्यापही सुरूच आहेत

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला झोडपून काढणारा पावसाळा तोंडावर आला असला तरीदेखील येथील नालेसफाईची कामे अद्यापही सुरूच आहेत. मुंबई शहरातील नालेसफाईवर महापालिकेने काहीसे लक्ष केंद्रित केले असले तरी पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे रेल्वेलगतच्या नालेसफाईबाबतही महापालिका कार्यवाहीच्या बेतात असली तरी या सफाईनेही प्रत्यक्षात वेग पकडलेला नाही. रेल्वेकडूनही पावसाळापूर्व कामे उरकण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. एकंदर मिठी नदीसह ठिकठिकाणचे नाले सफाईच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे नालेसफाईची कामे वरवर होत असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधकांकडून केला जात आहे. तर नालेसफाईवरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. अशाच काहीशा आरोप-प्रत्यारोपांसह रंगलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामावर दृष्टिक्षेप टाकणारी ‘लोकमत’ची ‘पंचनामा नालेसफाईचा’ ही मालिका...- सुशांत मोरे,  मुंबई.मागील वर्षीच्या जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात करताच त्याचा पहिला फटका मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल सेवेला बसला आणि ही सेवा नेहमीप्रमाणे ‘पाण्यात’ गेली. पावसाळ्यात सुरळीतपणे धावणारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा प्रथमच ठप्प झाली होती आणि पावसाळापूर्व कामाच्या तयारीचा दावा फोल ठरला. यंदाच्या पावसाळ्यात पुनरावृत्ती नको यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पावसाळापूर्व तयारी केल्याचा दावा पुन्हा एकदा करण्यात आला आहे.गेल्या वर्षी रुळांवरील पाण्याची पातळी वाढल्याने पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरारपर्यंतची सेवा बंदच ठेवण्यात आली. दोन दिवसांत पश्चिम रेल्वेवरील जवळपास ५00 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरलाही पावसाने दणका दिला होता. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मस्जिद, भायखळा, करी रोड, दादर, परेल, कुर्ला, विद्याविहार तर हार्बर मार्गावरील वडाळा, टिळकनगर, चेंबूर, कुर्ला आणि वाशी येथील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. रेल्वेकडून पाणी उपसा करण्यासाठी पंप मशिन बसविण्यात आले. मात्र या मशिनमधून पाणी उपसण्याचे काम व्यवस्थित होत नव्हते. ट्रॅकवरील पाणी हटत नसल्याने त्याचा फटका लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांना बसत होता. २0१५ मधील पावसाळ्यात काय झाला होता गोंधळसकाळी सहा वाजल्यापासून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प होण्यास सुरुवात.मध्य रेल्वेवरील सीएसटी ते कसारा, कर्जत, खोपोली सेवेवर परिणाम. तर सीएसटी ते पनवेल, वाशी सेवाही विस्कळीत.काही वेळेनंतर ठाणे ते कसारा, कर्जत, कल्याण सेवा आणि ठाणे ते वाशी सेवा धिम्या गतीने सुरू. मात्र सीएसटी ते ठाणे पूर्णपणे ठप्प होती.पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा प्रथमच बंद. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मोठा फटका.मध्य रेल्वेची यंदाची तयारीमध्य रेल्वेकडून पाणी साचणाऱ्या २0 ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून यामध्ये मेन लाइनवरील मस्जिद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, सायन, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नानीपाडा, ठाणे, मुंब्रा, डोंबिवली तर हार्बरवरील शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, टिळकनगर, चेंबूर या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणांवर एकूण पाणी उपसणारे २३ पंप मशिन बसविण्यात येतील.पालिकेकडून १५ ठिकाणी १६ पंप बसविण्यात येणार आहेत. यामध्ये माझगाव यार्ड, मस्जिद बंदर (पूर्व दिशा), भायखळ्यातील बेरक्ले हाऊस, भायखळ्यातील साईबाबा मंदिराजवळील रेल्वेचा पादचारी पूल, चिंचपोकळी स्थानकाबाहेर, परेल स्थानक, सायनमधील मुख्याध्यापक नाला, सायन स्थानकाजवळील एलबीएस मार्ग, गौरीशंकर वाडी, विद्याविहार स्थानक पूर्व, घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान, भांडुप प्लॅटफॉर्म क्रमांक एक, नाहूर स्थानक पूर्वेला, शिवडी स्टेशन गेट नंबर सातचा समावेश आहे.पावसाळापूर्व कामांसाठी मे अखेरपर्यंतचे उद्दिष्टपश्चिम आणि मध्य रेल्वेने पावसाळापूर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असा दावा केला आहे. पश्चिम रेल्वेने ३0 मे तर मध्य रेल्वेने ३१ मेची अंतिम मुदत ठेवली आहे. नालेसफाई, गटारांची सफाई, पंप मशिन बसविणे इत्यादी कामांचा यात समावेश आहे.पश्चिम रेल्वेची यंदाची तयारी, पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर लक्षपाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये मरिन लाइन्स, चर्नी रोड ते ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन रोड, दादर, माहीम, वांद्रे ते खार, अंधेरी ते जोगेश्वरी आणि नालासोपारा ते विरार यांचा समावेश आहे. पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी ८0 डिझेल पंप मशिन बसविण्यात येणार. रेल्वे रूळ वर उचलण्याची कामे पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे पाणी तुंबणार नाही, असा दावा केला जात आहे. चर्चगेट यार्ड, दहिसर ते मीरा रोड, भार्इंदर तसेच नालासोपारा ते विरार दरम्यानचे रूळ वर उचलण्यात येत असून ही कामे तीन टप्प्यांत पूर्ण केली जात आहेत.रेल्वेला धोका असणाऱ्या अशा मोठ्या नाल्यांची सफाई मुंबई पालिकेकडून केली जात असल्याची माहिती. यात मिठी नदी, धारावी नाला, पोईसर नाल्याचा समावेश. लोकलच्या इलेक्ट्रीक उपकरणांत पाणी जाऊ नये यासाठी रेल्वेकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. नालेसफाई आणि गटारांच्या सफाईचे काम प्रगतिपथावर. रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांसाठी मॉन्सून बुकलेट. उपनगरीय मार्गावर ५८ नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले असून यातील पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे, तर दुसरा टप्पा ३१ मेपर्यंत पूर्ण केला जाईल.१७ हजार ५00 क्यूबिक मीटर कचराही ट्रॅकवरून उचलण्यात आला आहे. मोठ्या दगडांमुळे लोकल सेवेला अडथळा ठरू शकतो, अशी ४३0 ठिकाणे शोधून काढण्यात आली असून त्या ठिकाणांवरून मोठे दगड बाजूला काढण्यात आले आहेत. प्रवाशांना मार्गदर्शन मिळण्यासाठी रेल्वेकडून पावसाळी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचा नियंत्रण कक्षही या वेळी २४ तास सुरू राहील.मागील वर्षी पश्चिम रेल्वेने पावसाळ्यात लोकल सुरळीत सुरू राहतील, असा दावा केला होता. मात्र जून महिन्याच्या १९ आणि २0 तारखेला पडलेल्या पावसात पश्चिम रेल्वेला मोठा फटका बसला. दादर ते एलफिन्स्टन, माटुंगा, वांद्रे स्थानकांजवळ तब्बल २00 ते २५0 मिलीमीटर एवढे पाणी साचले होते.