म्हाडाची नव्या वर्षात मुंबईकरांना नवीन घरांची भेट, मोनो, मेट्रोसमोर नवीन प्रकल्पांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:03 AM2018-12-27T05:03:13+5:302018-12-27T05:03:39+5:30

२०१८ हे वर्ष मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी समाधानकारक असेच होते. म्हाडाची महत्त्वपूर्ण अशी कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची घरांसाठीची लॉटरी या वर्षात उशिरा का होईना फुटली.

Challenge of new projects in front of MHADA | म्हाडाची नव्या वर्षात मुंबईकरांना नवीन घरांची भेट, मोनो, मेट्रोसमोर नवीन प्रकल्पांचे आव्हान

म्हाडाची नव्या वर्षात मुंबईकरांना नवीन घरांची भेट, मोनो, मेट्रोसमोर नवीन प्रकल्पांचे आव्हान

Next

- अजय परचुरे

मुंबई : २०१८ हे वर्ष मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी समाधानकारक असेच होते. म्हाडाची महत्त्वपूर्ण अशी कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची घरांसाठीची लॉटरी या वर्षात उशिरा का होईना फुटली. तर दुसरीकडे शहरात वाहतुकीसाठी उपलब्ध होणारा अजून एक पर्याय म्हणजे मोनो आणि मेट्रो रेल्वे. या प्रकल्पांच्या कामांमुळे सामान्य मुंबईकर जरी ट्रॅफिक जामच्या फेऱ्यात अडकला असला तरी येणाºया नवीन वर्षात यातील काही प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईकरांना वाहतुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार असल्याने २०१९ हे वर्ष म्हाडाच्या नवीन गृहप्रकल्पांसाठी आणि पायाभूत दळवळण आणि सोयीसुविधांसाठी नक्कीच सुखावह आणि महत्त्वपूर्ण आहे.

म्हाडाची मुंबईकरांना अधिक घरांची भेट
मुंबईत राहणारा प्रत्येक नागरिक या मायानगरीत आपलं एक तरी हक्काचं घर असावं यासाठी जंग जंग पछाडत असतो. परवडणाºया घरांसाठी हक्काचं ठिकाण म्हणजे म्हाडाची घरांसाठीची लॉटरी. ही लॉटरी केव्हा फुटते आणि आपल्याला म्हाडामध्ये परवडणारं घर कधी लागतं याच्या प्रतीक्षेत लाखो सर्वसामान्य मुंबईकर दरवर्षी असतात. बºयाच वर्षांनी म्हाडाच्या या अतिविशाल प्राधिकरणाला उदय सामंत यांच्या रूपाने हक्काचा अध्यक्ष लाभला आहे. म्हाडाने २०१८ मध्ये कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची घरांसाठी लॉटरी घेतली खरी. मात्र या दोनही लॉटरींना भयंकर उशीरही झाला ही बाब म्हाडा नाकारू शकत नाही.

म्हाडाच्या २०१९ मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा घरांसाठीच्या लॉटरी आहेत. आणि म्हाडाच्या नूतन अध्यक्षांनी २०१९ मध्ये होणाºया प्रत्येक लॉटरीमध्ये सर्वसामान्यांना जास्तीतजास्त घरांची संख्या आणि ती परवडणाºया दरातच मिळतील याची ग्वाही दिली आहे.
सन २०१९ मध्ये म्हाडाची सुरुवात होत आहे ती कोकण मंडळाच्या लॉटरीने. या लॉटरीत म्हाडा जवळपास ५ हजारच्या वर घरे लॉटरीमध्ये समाविष्ट करणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या कोकण मंडळाच्या लॉटरीत म्हाडाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. अनेक घरांची चक्क विक्रीही होऊ शकली नव्हती. यापासून बोध घेत म्हाडाने नव्या वर्षात कमी किमतींची आणि जास्त संख्या असलेली घरे उपलब्ध करून देण्याचा पण केला असून त्याप्रमाणे कोकण मंडळाच्या लॉटरीत तब्बल ५ हजार घरांची लॉटरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होणार आहे. तीच बाब मुंबई मंडळाच्या लॉटरीबाबतही आहे. २०१९ या वर्षात देशात लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभेची निवडणूक साधारणत: मार्च महिन्यात तर विधानसभेची निवडणूक साधारणत: सप्टेंबर महिन्यात होणार आहे. मुंबई मंडळाच्या लॉटरीला या दोनही महत्त्वूपर्ण निवडणुकीतील आचारसंहिता बसू नये म्हणून म्हाडा मुंबई विभागाची लॉटरी साधारण जुलै महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण करणार आहे.

घरांच्या किमती कमी झाल्याचा दिलासा

२०१८ मध्ये मुंबई मंडळाच्या लॉटरीत तब्बल १,३८४ घरे होती; मात्र २०१९ मध्ये म्हाडा मुंबई मंडळात तब्बल २ हजार घरांची लॉटरी करणार आहे. त्यामुळे मुंंबईकरांना या वेळी लॉटरीत जास्त घरांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
तसेच म्हाडाने २०१९ मध्ये होणाºया प्रत्येक लॉटरीत अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या किमती ५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना हा एक दिलासा आहे.

मेट्रो प्रकल्पांचे पुढचे पाऊल
ट्रॅफिक जाम आणि गर्दीने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प हा वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा हा मेट्रो १ प्रकल्पच सुरू आहे. मात्र बाकी सर्व प्रकल्पांचे काम सध्या मुंबईत जोरात सुरू आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो -३ प्रकल्प संपूर्ण भूमिगत आहे. सध्या मुंबईत या प्रकल्पाचं काम आघाडीवर आहे. प्रकल्प २०२१ मध्ये जरी पूर्ण होणार असला तरी या प्रकल्पातील काही मुख्य भागांचं काम २०१९ मध्येच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर दहिसर ते डी.एन. नगर हा मेट्रो २ अ प्रकल्प, डी.एन. नगर ते मंडाला हा मेट्रो २ ब प्रकल्पांचं महत्त्वपूर्ण कामही पुढील वर्षी पूर्ण होणार आहे.

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो ७ प्रकल्पांचं कामही पुढील वर्षात प्रगतिपथावर येणार आहे. २०१९ मध्ये मेट्रोच्या काही नवीन प्रकल्पांचं कामही सुरू होणार आहे. ज्यात ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५, लोखंडवाला ते विक्रोळी मेट्रो ६ आणि दहिसर-मीरा भार्इंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळपर्यंतच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

मोनोचा महत्त्वाकांक्षी दुसरा टप्पा होणार सुरू
एमएमआरडीएला नेहमी डोकेदुखी ठरलेला प्रकल्प म्हणजे मोनोरेल्वे. चेंबूरपासून जेकब सर्कलपर्यंत असलेला हा प्रकल्प अनेक कारणांनी वेळोवेळी गाजला आहे. २०१८ मध्ये ९ महिने बंद असलेली मोनोरेल्वे रडतखडत का होईना पुन्हा सुरू झाली. मात्र चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यातच ही मोनोरेल्वे सुरू झाली. ज्या टप्प्याला मुळातच लोकांचा अजिबातच प्रतिसाद नाहीये. मुळात वडाळा ते जेकब सर्कल या मोनोच्या दुसºया टप्प्याला प्रवाशांची जास्त मागणी आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी या भागात राहणाºया लाखो रहिवाशांची मागणी आहे. त्या मागणीप्रमाणे २ फेब्रुवारी २०१९ ला मोनोचा वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतचा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे डबघाईला आलेल्या मोनोला नवसंजीवनी मिळेल का नाही हे ठरणार आहे. मोनो रेल्वेचं
व्यवस्थापन पाहणाºया स्कोमी कंपनीला एमएमआरडीएने बाहेरचा रस्ता दाखवला आहे आणि सर्व व्यवस्थापन आता एमएमआरडीएनं आपल्याकडं घेतलं आहे. त्यामुळे २०१९ मध्ये मोनोला अच्छे दिन येणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरण़ार आहे.

Web Title: Challenge of new projects in front of MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.