Join us

मुंबई मनपापुढे १७०० कोटींच्या वसुलीचे आव्हान, तिजोरीत एकूण २७०० कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 9:45 AM

गुरुवारी ३०४ कोटींचा मालमत्ता कर भरणा. 

मुंबई : मुंबई पालिका प्रशासनाने गुरुवारी एकाच दिवसात मालमत्ता कराची तब्बल ३०४ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. तर शुक्रवारी दुपारी ३ पर्यंत  तिजोरीत एकूण २,७०० कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. दरम्यान, यंदाच्या आर्थिक वर्षात करवसुलीत मागील वर्षीपेक्षा ४६ टक्के तूट दिसून आली असून, ही तूट २,३९० कोटींची आहे. यंदा मालमत्ता कराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेला येत्या २ दिवसांत आणखी १,७०० कोटींची वसुली करावी लागणार आहे.

पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यास २७ फेब्रुवारीपासून सुरुवात केली. करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी या विभागाने अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. 

पश्चिम उपनगरातून सर्वाधिक करवसुली-

१ एप्रिल २०२३ ते २९ मार्च २०२४ पर्यंत जमा झालेल्या मालमत्ता करामध्ये आतापर्यंत सर्वाधिक करवसुली ही पश्चिम उपनगरातून झाली असून, ती १,३५६ कोटी इतकी आहे. त्या पाठोपाठ शहर विभागातून ७५४ कोटींची, तर पूर्व उपनगरातून ५८५ कोटींची मालमत्ता करवसुली झाली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.  

मागच्या वर्षी पश्चिम उपनगरातून २,५६७ कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात मुंबई महापालिकेला यश आले होते. शहर विभागातून मागील वर्षी १,४८५ कोटींची, तर पूर्व उपनगरातून १,०४० कोटींची मालमता कराची वसुली झाली होती.

वॉर्ड                कर वसुली 

ए वॉर्ड               १२६ कोटी बी  वॉर्ड            १९ कोटी सी वॉर्ड             ३६ कोटी डी वॉर्ड             १०३ कोटी ई वॉर्ड               ५४ कोटी एफ दक्षिण       ५० कोटी एफ उत्तर         ६२ कोटी जी दक्षिण         २०३ कोटी जी उत्तर           ९७ कोटी 

एच पूर्व           २७१ कोटी एच पश्चिम       १६२ कोटी के पूर्व             २७४ कोटी के पश्चिम         २०१ कोटी पी दक्षिण        १४५ कोटी पी उत्तर          १०३ कोटी आर दक्षिण     ७३ कोटी आर मध्य       ९२ कोटी आर उत्तर      ३४ कोटी 

एल वॉर्ड        १२५ कोटी एम पूर्व         ४७ कोटी एम पश्चिम     ६४ कोटी एन वॉर्ड        ७९ कोटी एस वॉर्ड       १९६ कोटी टी वॉर्ड         ७२ कोटी 

विभागीय स्तरावर कार्यालयीन, तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे काम सुरू आहे. समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधून, तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुली केली जात आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकर