Join us

शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 1:15 AM

एक लाख मराठी भाषिक मतदार । विमानतळ, मेट्रोमुळे मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष

मनोहर कुंभेजकर

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील १६६ अंधेरी पूर्व हा प्रामुख्याने औद्योगिक वसाहत आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेला आणि १,०३,१०० मराठी मतदार असलेला मतदारसंघ आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबरला येथील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीमुळे हा मतदारसंघ मुंबईपासून ते थेट दिल्लीपर्यंत चर्चेत आला. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो रेल्वेदेखील याच मतदारसंघातून मार्गक्रमण करीत जात असल्याने कामानिमित्त रोज मेट्रोने या मतदारसंघात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लाखांच्या वर आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने देशी व परदेशी प्रवासी येथून मार्गक्रमण करतात. तर येथे पंचतारांकित हॉटेल्सदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.

२०१४ पर्यंत हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत सुरूंग लावला. कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ४,६४,८२० तर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गुरुदास कामत यांना २,८१,७९२ मते मिळाली. कीर्तिकर यांनी मोदी लाटेत कामत यांचा १,८३,०२८ मतांनी दारुण पराभव केला होता. २००९ साली कामत यांनी कीर्तिकर यांचा येथून पराभव केला होता, त्याची परतफेड कीर्तिकर यांनी केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात कीर्तिकर यांना ७८,८६३, कामत यांना ४६,८०४, आपच्या मयांग गांधी यांना ७,५०४ तर मनसेच्या महेश मांजरेकर यांना ११,०९९ मते मिळाली होती. या निवडणुकीत कीर्तिकर यांनी कामत यांचा ३२,०५९ मतांनी पराभव केला होता.

२०१४ नंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी युती तुटली. येथून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके हे भाजपचे सुनील यादव यांचा पराभव करून निवडून आलेत तर माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी हे तिसºया क्रमांकावर गेले.अंधेरी पूर्व क्षेत्रात एकूण मतदार २,४७,४२९ असून पुरुष मतदार १,४५,४२४ तर महिला मतदारांची संख्या १,२१,४१० इतकी आहे. यामध्ये जातीनिहाय मराठी मतदार १,०३,१००, उत्तर भारतीय ५५,२००, अल्पसंख्याक ३६,४००, गुजराती/राजस्थानी ३३,६००, दक्षिण भारतीय १८,६०० ख्रिश्चन १४,५०० इतर ६,००० अशी मतदारांची संख्या आहे.२०१७ च्या पालिका निवडणुकीतदेखील शिवसेना व भाजप युती तुटली होती. या वेळी येथून भाजपचे ४, काँग्रेसचे २ व शिवसेनेचे २ असे एकूण ८ नगरसेवक निवडून आले. उच्च न्यायालयाने भाजपच्या प्रभाग क्रमांक ७६ च्या नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल व प्रभाग क्रमांक ८१ चे भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचा जातीचा दाखला अवैध ठरवत त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. त्यामुळे येथून शिवसेना १ व काँग्रेसच्या दुसºया क्रमांकावरील उमेदवाराला संधी मिळणार आहे़राजकीय घडामोडीच्महायुतीचे गजानन कीर्तिकर, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे संजय निरुपम यांच्यात प्रमुख लढत आहे.च्युतीची ताकद येथे वाढली असून २०१४ मध्ये कीर्तिकर यांना येथून मिळालेली ३२,०५९ मतांची लीड वाढविण्यासाठी युतीनेदेखील कंबर कसली आहे.च्येथील जातीनिहाय मतदारसंघातील आकडेवारीच्या आधारावर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीतजास्त मते स्वत:कडे खेचण्यासाठी महायुती व आघाडी यांचा प्रयत्न असेल.दृष्टिक्षेपात राजकारणच्येथे गेली साडेचार वर्षे भाजप व शिवसेनेत श्रेयवादाची लढाई होती. मात्र गेल्या १७ फेब्रुवारी रोजी सेना व भाजपत मनोमिलन होऊन आगामी निवडणुकांसाठी युती झाली. आणि दोन भांडणारे पक्ष आता एकदिलाने काम करीत आहेत. त्यामुळे येथे युतीची ताकद वाढली आहे.च्आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा तसेच निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी नियुक्त केलेले उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष क्लाइव्ह डायस आणि मुंबई काँग्रेस महिला सरचिटणीस सुरक्षा घोसाळकर आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. निरुपम यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे.

 

टॅग्स :मुंबई