अनधिकृत बांधकामांचे महापालिकेपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:12 AM2019-07-17T06:12:52+5:302019-07-17T06:13:00+5:30

डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

Challenges to the unauthorized construction corporation | अनधिकृत बांधकामांचे महापालिकेपुढे आव्हान

अनधिकृत बांधकामांचे महापालिकेपुढे आव्हान

Next

मुंबई : डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. तांडेल मार्गावरील ही अनधिकृत इमारत एक-दोन नव्हे, तर दोन दशकांपूर्वी उभी राहिली आहे. अशा अनेक अनधिकृत इमारती मुंबईत कोणत्याही कारवाईविना उभ्या आहेत. अनधिकृत बांधकामांबाबतच्या तब्बल ७६,४९१ तक्रारी महापालिकेकडे गेल्या वर्षीपर्यंत आल्या आहेत. यामध्ये इमारतींमधील ३३ हजार बेकायदा बांधकामांचा समावेश आहे.
तांडेल मार्गावरील अब्दुल हमीद दर्ग्यानजीक असलेले चार मजली इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. या इमारतीची जबाबदारी नेमकी कोणाची? याबाबत अनेक वाद दिवसभर रंगत राहिले. दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची असल्याचे सांगण्यात येत असताना, दुपारनंतर म्हाडाने या इमारतीची जबाबदारी नाकारली. २०१७ मध्ये महापालिकेने केसरबाई इमारतीला नोटीस पाठविल्याचे सांगितले. मात्र, दुर्घटनाग्रस्त इमारत ही अनधिकृत असल्याचे संध्याकाळी सांगण्यात आले, यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
डोंगरी येथील केसरबाई इमारतीचा कोसळलेला भाग १९८८ मध्ये बेकायदा प्रकारे बांधण्यात आला होता. अशाच प्रकारे मुंबईतील ३३ हजार इमारतींमध्ये बेकायदा बांधकामे करण्यात आल्याचे लाइट डिटेक्शन अँड रेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. १ मार्च, २०१६ रोजी ते २०१८ पर्यंत ७६ हजार ४९१ अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची नोंद महापालिकेकडे झाली. मात्र, यापैकी केवळ ४,८६६ तक्रारींची दखल घेण्यात आली, असे माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आले आहे.
अनधिकृत बांधकामांवर अंकुश नाहीच...
पायधुणी, डोंगरी, मोहम्मद अली मार्गाच्या परिसरात हजारो जुन्या चाळी असून, त्यांची शंभर टक्के दुरुस्तीची परवानगी महापालिकेकडून घेतली जाते. इमारत पाडून त्याऐवजी बेकायदा वाढीव मजले बांधले जातात. पालिकेने दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारे ४८ इमारती जमीनदोस्त केल्या होत्या. ३३ हजार बेकायदा बांधकामांमध्ये काही इमारती बेकायदा मजले बांधण्यात आले आहेत. काही इमारती अंतर्गत बदल करण्याबरोबरच मूळ वापरताही बदल करण्यात आला आहे.
अरुंद रस्ते, चिंचोळ्या
गल्ल्यांचा अडथळा...
मुंबईत प्रामुख्याने दक्षिण मुंबई भागात अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये दाटीवाटीने इमारती उभ्या आहेत. या इमारतींमध्ये दुर्घटना घडल्यास मदतकार्यात असंख्य अडथळे येत आहेत. डोंगरी दुर्घटनेतून हा धोका पुन्हा एकदा दिसून आला. चिंचोळ्या गल्ल्यांमधून अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका पोहोचणे अवघड होत होते.
>‘ती’ इमारत आमची नाही - म्हाडा
डोंगरी येथे तांडेल स्ट्रीट येथील कोसळलेली इमारत ही म्हाडाची नसल्याचा दावा म्हाडा प्रशासनाने केला आहे. डोंगरी येथील २५/सी केसरबाई ही इमारत कोसळल्याचे काही खासगी वाहिन्यांद्वारे सांगण्यात येत होते. मात्र, २५/सी केसरबाई उपकरप्राप्त इमारत कोसळलेली नसून, आजही सद्य:स्थितीत उभी आहे. २५/सी केसरबाई ही इमारत वास्तव्यास धोकादायक असल्याने, सन २०१८ साली म्हाडाने या इमारतीतील रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देऊन रिकामी करवून घेतली. यामुळे सद्य:स्थितीत ही इमारत रिकामी असल्याचे म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेमध्ये २५/ सी केसरबाई इमारतीच्या मागील अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला आहे. हे अनधिकृत बांधकाम उपकरप्राप्त नसल्याने, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोडत नसल्याचे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी सांगितले.
>इमारत नेमकी कोणाची?
डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त केसरबाई
इमारतीच्या मालकीवरून महापालिका आणि म्हाडामध्ये मंगळवारी दिवसभर वाद रंगला. ही इमारत म्हाडाची असल्याचे दुर्घटनेच्या काही तासांतच चर्चा सुरू झाली, म्हाडानेही तशी जबाबदारी स्वीकारली. २०१७ मध्ये या इमारतीला नोटीस दिल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. मात्र, नंतर म्हाडाने पडलेली इमारत
आपली नसून, अनधिकृत असल्याचे सांगितले. केसरबाई इमारतीच्या एका विंगचा भाग १९८८ मध्ये कोसळल्यानंतर पुन्हा बांधण्यात आला होता. त्यावेळी १९९० मध्ये आम्ही मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती, असे
म्हाडाने सांगितले. आज कोसळलेला तो हाच इमारतीचा अनधिकृत भाग असल्याचे म्हाडाचे म्हणणे आहे.
>कुठे आक्रोश, तर कुणाच्या डोळ्यात पाणी साठलेले
आपले नातेवाईक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने कुठे आक्रोश, तर कुणाच्या डोळ्यात पाणी साठलेले होते. ढिगाºयाखाली आपल्या परिवारातील सदस्य, शेजारी जिवंत राहण्याची प्रार्थना प्रत्येक जण करत होता. प्रत्येकांकडून मदतीसाठी धाव घेतली जात होती. मात्र, जवळील व्यक्तीस वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते.
दररोज आपआपल्या कामात व्यस्त असलेले रहिवासी एकमेकांना मदत करताना दिसत होते. दररोज लहान मुले आणि पालक यांची शाळेत जाण्याची आणि येण्याची लगबग सुरू असते. मात्र, मंगळवारी येथे ढिगाºयातून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. शाळेची गाडी जेथे येते, तेथे आज रुग्णवाहिका, अग्निशमनच्या गाड्या येत होत्या. वातावरण भयभीत झाले होते, असे स्थानिकांनी सांगितले.
स्थानिक रहिवासी आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने ढिगारा काढला जात होता. मृत अथवा जखमींना जवानांच्या माध्यमातून मानवी साखळी पद्धतीने रुग्णवाहिकेत नेले जात होते.
शेजारील नागरिकांना तात्पुरता आश्रयासाठी मदरसा, शाळा, दर्ग्यात नेण्यात आले. यावेळी त्यांना खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी देण्यात आले.
घटनास्थळी अग्निशमन दलास आवश्यक असलेल्या जादा गॅस कटर्स व क्रॉकीट कटर्सची व्यवस्था एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून करण्यात अली.
केईएम, नायर रुग्णालयाच्या रुग्णवाहिका, १०८ वैदयकीय सेवेच्या १८ रुग्णवाहिका, २ बाइक रुग्णवाहिका याचा वापर करून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.
>वृत्त ऐकून दु:ख झाले
मुंबईत इमारत कोसळून जीवितहानी झाल्याचे वृत्त ऐकून दु:ख झाले. दुर्घटनेत मृत पावलेल्या नातेवाईकांच्या प्रती मी सहानुभूती व्यक्त करतो आणि दुर्घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बचावकार्य सुरू असून स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करीत आहे.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
डोंगरी इमारत दुर्घटना क्लेशदायक
या दुर्घटनेत महिला व लहान मुलांसह निरपराध लोक सापडले आहेत तसेच काही लोकांना आपला जीव गमवावा लागला, ही अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे. सर्व मृत व्यक्तींच्या नातलगांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो तसेच सर्व जखमी व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो.
- सी. विद्यासागर राव , राज्यपाल
दोषींवर कठोर कारवाई करणार
डोंगरी येथील अपघाताला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. जखमींना जलद गतीने मदत पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. मुंबईतील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासनाने अशा इमारतीमधील नागरिकांचे तत्काळ पुनर्वसन करण्याची गरज आहे. या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
- सुभाष देसाई, पालकमंत्री
दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा
या दुर्घटनेला म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार असून संबंधित सर्वांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी.
- विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते
>डोंगरीची घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळे
सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. पाऊस सुरु झाला की मुंबईत दुर्घटनांची साखळी सुरू होते. पण यावर्षी तर कहर झाला असून गटारात पडून माणसे वाहून जात आहेत, भिंत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागतोय, पण सरकार आणि पालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. धोकादायक इमारतींवर कारवाई करून लोकांचे पुनर्वसन करण्याची बाब अधिवेशनकाळात सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार निवडणुकीत गुंतलेले आहे. ही सरकारची अक्षम्य चूक आहे.
- जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष
युतीची निष्क्रियता चव्हाट्यावर
डोंगरी परिसरात कोसळलेली इमारत आणि उच्च न्यायालयाने रद्द केलेली कोस्टल रोडची सीआरझेड मंजुरी, या दोन घटनांमधून पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेची मुंबई शहराबाबतची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. २०१७ मध्ये महानगरपालिकेने ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये या इमारतीचे आॅडिट झाले होते का? आॅडिट झाले असेल तर त्याचा निष्कर्ष काय होता? आॅडिट झाले नसेल तर त्याची जबाबदारी कोणाची? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येणे आवश्यक आहे.
-अशोक चव्हाण, काँग्रेस नेते
ंदोषींवर सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करा
मुंबईत वारंवार अशा घटना घडत आहेत. कधी आगीमध्ये लोकांचा जीव जातोय तर कधी पुल कोसळून लोकं मरत आहेत. तर काही ठिकाणी बुडून लोकं मरत आहे.या प्रकरणात

Web Title: Challenges to the unauthorized construction corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.