Join us

गर्दीला आवर घालण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:08 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. विशेषत: कामाच्या ठिकाणी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. विशेषत: कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना खूप कसरत करावी लागली. लोकल सेवा सर्वसामान्यांना बंद असण्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळाला.

नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास वेळ लागणार नाही. १५ ऑगस्टपासून लसीकरण केलेल्या प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करता येईल. मात्र प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. रेल्वे प्रवाशांना शिस्त लावण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ पुरवावे.

- सदानंद पावगी, उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

सध्याची प्रवासी संख्या २३ लाख

अपेक्षित प्रवासी संख्या २८ लाख