Join us

पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 7:17 PM

मध्य महाराष्ट्रात येत्या बारा तासात ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

मुंबई : कमी दाबाचा हा पट्टा पश्चिम- वायव्य भागात सरकेल. अरेबियन समुद्राच्या पूर्व मध्य तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात आणि अरबी समुद्राजवळ  उत्तर-पूर्व भागात आणि महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर पुढील ४८ तासात तीव्र स्वरुपाचा होईल. तो पुढे पश्चिम- वायव्येच्या दिशेने सरकून अधित तीव्र स्वरुपाचा होईल. दरम्यान, परतीचा पाऊस आजही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आहे. ६ ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाचा प्रवास कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढे सरकला नाही. 

मध्य महाराष्ट्रात येत्या बारा तासात ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हा वेग ताशी ४०  किलोमीटरपर्यंतही पोहोचेल. त्यानंतर तीव्रता कमी होईल. अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात तसेच उत्तर-पूर्व भागात ताशी २५ ते ३५ ते  ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहतील. गोवा महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीच्या प्रदेशात पुढील १२ तास ही स्थिती कायम असेल. तीन दिवस  महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर तसेच अरबी समुद्राच्या पूर्व मध्य आणि ईशान्य भागात  जाऊ नये असा इशारा मच्छिमारांना देण्यात येत आहे.

१६ ऑक्टोबर : हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुसंख्य ठिकाणी, कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार ते अती जोरदार, दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची शक्यता.

१७ ऑक्टोबर : वादळी वाऱ्यांचा वेग वाढत जाऊन अरबी समुद्राच्या मध्य पूर्व भागात तसेच ईशान्येकडे याचा जोर वाढत जाऊन महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला १६ ऑक्टोबर संध्याकाळपासून जोरदार वारे वाहतील.  याच भागात वाऱ्याचा वेग १७ ऑक्टोबरला वाढून ताशी 50 ते 65 ते 75 पर्यंत जाऊ शकेल.

१८ ऑक्‍टोबर : अरबी समुद्राच्या पूर्व मध्यभाग आणि ईशान्य भागात समुद्र खवळलेला ते अती खवळलेला राहील. ही स्थिती महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर आज संध्याकाळपासून १८ ऑक्‍टोबर पर्यंत कायम राहील.

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्रमुंबई