राज्यात उद्यापासून पुन्हा जाेरदार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:07 AM2021-09-03T07:07:53+5:302021-09-03T07:08:08+5:30

३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

Chance of heavy rains in the state again from tomorrow pdc | राज्यात उद्यापासून पुन्हा जाेरदार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

राज्यात उद्यापासून पुन्हा जाेरदार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

googlenewsNext

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असू शकतो असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल.

Web Title: Chance of heavy rains in the state again from tomorrow pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.