Join us

मुंबईत दिवाळीत पावसाची शक्यता, ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 7:31 AM

दक्षिण भारतातील पावसाचा हा किंचित परिणाम असेल, अशी माहिती हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने दिली.

मुंबई : राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश असून, किमान तापमान १५ अंशाच्या आसपास आहे. हवामान स्थिर असतानाच येत्या आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील पावसाचा हा किंचित परिणाम असेल, अशी माहिती हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने दिली.

मुंबईत प्रदूषणाने कहर केला असतानाच दुसरीकडे वाढत्या कमाल तापमाननेही मुंबईकरांना नकोसे केले आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पडलेली थंडी वगळता मुंबईचा पारा आता चढाच आहे. तर राज्यातही तापमान फार काही खाली घसरलेले नाही.

कमाल तापमानअलिबाग    ३५.४डहाणू    ३६.८मुंबई    ३६.८रत्नागिरी    ३६.६सोलापूर    ३४.४सातारा    ३२.६सांगली    ३२परभणी    ३२.६नांदेड    ३२.८कोल्हापूर    ३२.३जळगाव    ३३.६

टॅग्स :मुंबईपाऊस