मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार हाेत असलेल्या निवर या चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, परभणी आदी जिल्ह्यांतील काही भागात येत्या आठवड्यात पाऊस तसेच काही ठिकाणी पावसाबरोबर गारा पडतील. तर नंदूरबार, धुळे, जळगाव व नाशिकच्या काही भागात पाऊस पडेल. दिवाळी संपून आता नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध आला तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात अद्यापही अपेक्षित थंडी पडलेली नाही. कारण हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, सातत्याने ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे.
डिसेंबरमध्ये पारा आणखी खाली येणारयंदा पाऊस जास्त झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणखी गारठणार असून, मुंबईचे तापमान डिसेंबरपर्यंत १५ अंशाच्या खाली घसरेल. मुंबईबरोबरच पुण्याचा पारा ७, नागपूरचा ५ अंशाखाली जाण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामधील निफाडचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत जाईल.