संपकरी डॉक्टरांना ‘मेस्मा’ लावा - सभापतींचे निर्देश
By admin | Published: April 8, 2016 02:19 AM2016-04-08T02:19:34+5:302016-04-08T02:19:34+5:30
जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे.
Next
मुंबई : जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या डॉक्टरांवर ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या संपावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपासून बैठका सुरू आहेत, असे सांगितले.
राज्यातील निवासी डॉक्टर संपावर
जे.जे.तील संपाला पाठिंबा देत राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांनी ८ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. (प्रतिनिधी)