लोकलच्या गर्दीत चाेरटे साधतात संधी; गेल्या पाच महिन्यांत ५,९२७ गुन्ह्यांची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:50 AM2024-06-27T10:50:39+5:302024-06-27T10:50:57+5:30

महामुंबईकरांची लाइफ मानल्या जाणाऱ्या रेल्वेत दिवसभर तुडुंब गर्दी असते.

Chances are you'll be able to navigate the local crowd 5,927 crimes recorded in last five months | लोकलच्या गर्दीत चाेरटे साधतात संधी; गेल्या पाच महिन्यांत ५,९२७ गुन्ह्यांची नाेंद

लोकलच्या गर्दीत चाेरटे साधतात संधी; गेल्या पाच महिन्यांत ५,९२७ गुन्ह्यांची नाेंद

संतोष बिचकुले

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महामुंबईकरांची लाइफ मानल्या जाणाऱ्या रेल्वेत दिवसभर तुडुंब गर्दी असते. हीच संधी साधत गेल्या पाच महिन्यांमध्ये चाेरांनी पाच हजार ९२७ प्रवाशांना लुटले. या प्रकरणी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवरील लाेहमार्ग पाेलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

कर्जत-कसारा-पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पालघर ते चर्चगेट दरम्यान दरराेज लाखाेंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. पहिल्या लाेकलपासून रात्रीच्या शेवटच्या गाडीपर्यंत प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीत डल्ला मारण्यासाठी चाेरटेही शिरतात, हे जानेवारी ते मे २०२४ दरम्यान झालेल्या ५ हजार ९२७ गुन्ह्यांवरून सिद्ध झाले आहे. प्रवाशांच्या बॅगा, माेबाइल पळवण्याकडे चाेरांचा सर्वाधिक कल असल्याचेही समाेर आले आहे. यापैकी केवळ २ हजार १७४ गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे लाेहमार्ग पाेलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चोरीला गेलेला ऐवज
माेबाइल     ३६७१ 
पाकीटमारी     १७२७ 
बॅग     ४८२ 
साेनसाखळी     ४१ 
घड्याळ     ५
बॅगेतील ऐवज     १

Web Title: Chances are you'll be able to navigate the local crowd 5,927 crimes recorded in last five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.