Join us

मानवी तस्करी प्रकरणातील मुलांचा शोध सुरू आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

By admin | Published: May 03, 2017 4:03 AM

पंजाबमधील अल्पवयीन मुलांची विदेशात तस्करी केलेल्या मुलांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या

मुंबई : पंजाबमधील अल्पवयीन मुलांची विदेशात तस्करी केलेल्या मुलांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंजाबच्या अमृतसर भागातल्या अल्पवयीन मुलांच्या तस्करीचा पर्दाफाश केल्यानंतर सुरुवातीला या प्रकरणात आरिफ फारुकी (३८), राजेश पवार, फातिमा अहमद या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्या पाठोपाठ सुनील नंदवानी (५३), नरसैया मुंजली (४५) या दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्यासह दक्षिण मुंबईतील रफिक पांचाळलाही अटक करण्यात आली. त्यांची या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. पांचाळ हा अल्पवयीन मुलांचे बनावट पासपोर्ट बनविण्याचे काम पाहत असे. त्याने आतापर्यंत किती मुलांचे बनावट पासपोर्ट बनविले याचा शोध सुरू आहे. तस्करी केलेल्या मुलांचा शोध पोलीस घेत आहेत. आरिफकडे सापडलेल्या डायरीत ११० मुलांची नोंद आढळून आली आहे. त्यामुळे ही मुले नेमकी कुठे आहेत, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. या प्रकरणात मुंबईतील आणखी काही जणांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यताही गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)