चांदिवलीत प्रतिशिर्डी; साईभक्तांना पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:02 AM2018-09-12T02:02:08+5:302018-09-12T02:02:20+5:30

साईबाबांच्या समाधीला १८ आॅक्टोबरला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. साईबाबांचा समाधी शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे.

Chandivalli Patshardi; The devotees of the devotees | चांदिवलीत प्रतिशिर्डी; साईभक्तांना पर्वणी

चांदिवलीत प्रतिशिर्डी; साईभक्तांना पर्वणी

googlenewsNext

मुंबई : साईबाबांच्या समाधीला १८ आॅक्टोबरला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. साईबाबांचा समाधी शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे. हेच औचित्य साधून ‘चांदिवलीचा महाराजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षात प्रतिशिर्डीचा देखावा २० हजार चौरस फूट मैदानावर साकारला आहे, अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक ईश्वर तायडे यांनी दिली.
कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेप्रमाणे श्रीसाई समाधी मंदिर, द्वारकामाई मंदिर, खंडोबा मंदिर, प्रशस्त राजमहालात विराजमान चांदिवलीचा महाराजा आणि तीन प्रवेशद्वारे ही देखाव्याची वैशिष्ट्ये आहेत.
मुंबई, ठाणे परिसरातील सर्व साईभक्त व पदयात्री मंडळांनी व गणेशभक्तांनी येथे भेट द्यावी, असे आवाहन तायडे यांनी केले आहे.
दरम्यान, अशोक काचळे, विनायक कुंभार, विष्णू आवटे, रवींद्र नेवरेकर, संजय काळसेकर, प्रमोद हुले, संजय नलावडे, भालचंद्र काबाळे यांच्या समन्वय समितीने वर्षभर यासाठी नियोजन केले आहे.

Web Title: Chandivalli Patshardi; The devotees of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.