Join us

Chandrakant Patil: ... अन् चंद्रकांत पाटलांनी अचानक गाडी थांबवून मुलांना चॉकलेट्स दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 23:56 IST

सदर उपक्रम सुरू असतांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहान मुलांनी रंगवलेल्या भिंतीच्या सुशोभिरणाचे कौतुक केले

मुंबई - प्रभाग क्रमांक 52 मधील परिसर  सुशोभीकरण अंतर्गत गोरेगाव (पूर्व) आरे चेक नाका नजिक असलेल्या दूध सागर वसाहती समोरील भिंतींवर चित्र रंगवण्याचे कार्यक्रमाचे आज सकाळपासून प्रभागातील लहान मुलांसाठी आयोजन केलं होते. सदर रंगवलेल्या भिंतीच्या सुशोभिरणामुळे येथील परिसराचे रुपडे पालटले आहे.

सदर उपक्रम सुरू असतांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहान मुलांनी रंगवलेल्या भिंतीच्या सुशोभिरणाचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यांचा साधेपणा आणि प्रोत्साहन पाहून सहभागी लहान मुले पालक व कार्यकर्ते अगदी भारावून गेले. 

या ठिकाणाहून जात असताना त्यांनी आवर्जून आपली गाडी थांबून या मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलांना चॉकलेटचे वाटप केले. तसेच सदर उपक्रम राबवणाऱ्या येथील माजी नगरसेविका प्रिती सातम यांचे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांच कौतुक केले. आपल्या नेत्यांनी अशा पद्धतीने प्रोत्साहन देणं यापेक्षा कार्यकर्त्यांना अजून काय हवं असतं, असे मत प्रिती सातम यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :चंद्रकांत पाटीलमुंबईबालदिन