Chandrakant Patil: जिथं फडणवीस तिथं यश हे समीकरणच बनलंय, पाटलांनी सांगितलं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:54 PM2022-03-11T18:54:08+5:302022-03-11T19:06:37+5:30
देवेंद्र फडणवीस यांना गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती
मुंबई - देशातील मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात असलेल्या 5 राज्यांच्या निकालात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली असून भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. या निकालानंतर देशभर भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला आहे. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या युपीत भाजपने पुन्हा विजय मिळवला. त्यामुळे, देशभरात भाजप नेत्यांनी जल्लोष केला आहे. महाराष्ट्राला शेजारी असलेल्या गोव्यातही भाजपची सत्ता स्थापन होत आहे. त्यामुळे, मुंबईतदेवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत झाले.
देवेंद्र फडणवीस यांना गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. या निवडणुकीत गोव्यात भाजपला चांगले यश मिळाले, भाजपने 20 जागा जिंकल्या असून सहयोगी पक्ष आणि काही अपक्षही त्यांच्यासमेवत आहेत. त्यामुळे, येथे भाजपच सरकार स्थापन करणार आहे. गोव्याच्या या विजयानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या जल्लोषात स्वागत-सत्कार करण्यात आला.
आधी बिहार आणि आता गोवा...@Dev_Fadnavis तिथे यश हे समीकरणच झालंय. गोवा विधानसभा निवडणूक पुन्हा भाजपानेच जिंकली. उमेदवार निवडीपासून रणनीतीपर्यंत चौफेर लक्ष देऊन अचूक निर्णय घेणारे या विजयाचे शिल्पकार देवेंद्रजींचे मुंबईत भव्य, जंगी स्वागत करताना उत्साह गगनातही मावत नव्हता...! pic.twitter.com/wSNdqZ7XpU
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 11, 2022
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं कौतूक केलं. तसेच, जिथे फडणवीस तिथे यश हे समीकरण असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी बिहार विधानसभेसाठी त्यांना प्रभारी म्हणून पाठविण्यात आलं होतं. त्यावेळी, भाजपने बिहारमध्ये घवघवीत यश मिळवलं. आता, गोव्यातही भाजपला दणदणीत यश मिळालं आहे. उमेदवार निवडीपासून रणनीतीपर्यंत चौफेर लक्ष देऊन अचूक निर्णय घेणारे या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस असल्याचे पाटील यांनी म्हटले. तसेच, मुंबईच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
म्हणजे भींतीवर डोकं आपटण्यासारखं
'एक परिपक्व राजकीय नेता म्हणून मी निकालावर लगेच मत मांडणं योग्य नाही. पण, सध्या जे चित्र दिसत आहे, त्यावरुन 5 पैकी 4 राज्यांत भाजपच विजयी होईल. युपीत सर्व महिलांनी भाजपला मतदान केलं असेल आणि पुरुषांनी समाजवादी पक्षाला, असेही पाटील यांनी म्हटले. तसेच, भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे,' असेही ते म्हणाले.