Join us  

पाटलांचं भाकीत! "लिहून ठेवा 2024 ला विधानसभेत भाजपा 160 ते 170 जागा जिंकणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 7:58 AM

धनंजय महाडिकांच्या विजयाने कोल्हापूर महाडिक कुटुंबाचे राजकीय वजन वाढलेच

कोल्हापूर/मुंबई - राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेची लढत अत्यंत चुरशीचा झाली. ५ जागांवर भाजपाचे २ तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा १-१ उमेदवार बिनविरोध निवडून आला. पण निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवारांना पराभूत करून भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी लक्षवेधी विजय मिळवला. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरात भव्य विजयी रॅली काढली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी 2024 विधानसभेचं भाकीत केलं आहे. 

धनंजय महाडिकांच्या विजयाने कोल्हापूर महाडिक कुटुंबाचे राजकीय वजन वाढलेच. पण त्यासोबतच मूळचे कोल्हापूरचे असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही आनंद गगनात मावत नव्हता. चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या विजयानंतर भव्य रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकांचं भाकितही केलं. '2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकट्याने लढणार आहोत. मग त्यांनी तिन्ही पक्षाने सोबत यावे की, एकट्याने यावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असं भाकितच पाटील यांनी कोल्हापुरातून वर्तवलं. दरम्यान, विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजपाच्या कार्यकर्ते पाहायला मिळाले. तर, 'महाडिक यांचा परत नाद कराल का?' अशा आशयाचे काही छोटे फलकही कार्यकर्त्यांच्या हाती दिसून आले.

आता विधानपरिषदेतही हेच होणार

ये तो झांकी है 20 तारीख अभी बाकी है, राज्यसभेच्या झटक्यातून महाविकास आघाडी योग्य निर्णय करेल. सोमवारी अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. राज्यसभेची निवडणूक मत दाखवून होती, त्यातसुद्धा आम्ही विजयी झालो. विधानपरिषदेला तर गुप्त मतदान, इथे आम्हाला प्रतिसाद जास्त मिळेल. देवेंद्र फडणवीस यांना अनेकांनी हात दाखवून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे राज्यसभेच्या निवडणुकीतच दाखवून दिले आहे, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलभाजपानिवडणूककोल्हापूरविधानसभा