चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका; जांबोरीवरील सभेबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 07:16 AM2018-12-29T07:16:29+5:302018-12-29T07:16:44+5:30

भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांना मालाड येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी शुक्रवारी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करत भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला.

 Chandrasekhar Azad's release from prison; Question about Jambori meeting | चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका; जांबोरीवरील सभेबाबत प्रश्नचिन्ह

चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका; जांबोरीवरील सभेबाबत प्रश्नचिन्ह

Next

मुंबई : भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांना मालाड येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी शुक्रवारी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करत भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांनी सायंकाळी गोंधळ घातल्यानंतर आझाद यांना हॉटेलमधून दादरमधील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सोडण्यात आले. मात्र पोलिसांकडून सभा होऊ नये म्हणून दडपशाही सुरू असली, तरी नियोजित दौऱ्याप्रमाणेच वरळीतील सभांसह इतर सभाही होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
त्याआधी शुक्रवारी दुपारी मालाडमधील एका हॉटेलमध्ये आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप अशोक कांबळे यांनी केला. कांबळे म्हणाले की, चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौºयावर आले आहेत. या दौºयादरम्यान आझाद यांच्या मुंबईसह महाराष्ट्रात सलग चार जाहीर सभांचे आयोजन केले आहे.
२९ डिसेंबरला त्यांची मुंबईत होणारी सभा होऊ नये, यासाठी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. मात्र सायंकाळी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आझाद यांना चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी सोडण्यात आले. पोलिसांनी कितीही खडा पहारा ठेवला, तरी नियोजित वेळी सभा होणार असल्याचा दावा कांबळे यांनी केला.
दरम्यान, जांबोरी, पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन ३० डिसेंबरला आहे.
मात्र आझाद यांनी या सभेला जाऊ नये, असे आवाहन पोलीस करत आहेत. या सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून परवानगी नाकारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title:  Chandrasekhar Azad's release from prison; Question about Jambori meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई