Join us

बाळांचे ओले डायपर वेळीच बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या बाळाला जन्मापासूनच डायपर घालायला सुरुवात केली जाते. बाळाची त्वचा अत्यंत नाजूक आणि मुलायम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या बाळाला जन्मापासूनच डायपर घालायला सुरुवात केली जाते. बाळाची त्वचा अत्यंत नाजूक आणि मुलायम असते आणि म्हणून डायपर परिधान केल्याने त्यांना डायपर रेशेज होण्याचा धोका असतो. बाळाच्या त्वचेवर लाल रंगाच्या पुळ्या वा रॅशेज दिसत असतील की बाळाला डायपर रॅशेज आले आहेत आणि त्वचेची काळजी घ्यायला हवी. त्याशिवाय, या माध्यमातून टाईप टू मधुमेहाचा धोका संभावत असल्याचे दिसून आले आहे.

बालरोगतज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, हा आजार ऑटो इम्युन असून त्यात शरीरातच प्रतिक्रिया होते, जी पॅनक्रियाजमध्ये इन्शुलिन तयार करणाऱ्या सेल्सला मारून टाकते. यामुळे मुलाच्या शरीरातील इन्शुलिन घटते आणि त्यांना इन्शुलिनचा वेगळा डोस द्यावा लागतो. बालपण व किशोरावस्थेतच टाइप १ डायबिटीज लक्षात येतो.

पालकांना मधुमेह असेल तर

घरात रक्ताच्या नात्यातील कुणाला मधुमेह असेल तर बाळाला मधुमेहाची लागण होण्याचा अधिक धोका असतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहार, झोप नीट नसल्याने अनेक आजारांची लागण होते

काय आहेत लक्षणे

-तहान, भूक जास्त लागणे

-वारंवार लघवी येणे

-अचानक वजन कमी होणे

-चिडचिडेपणा जास्त जाणवणे

-वारंवार आजारी पडणे, सतत सर्दी होणे

काळजी काय घ्यावी

फास्टफूड, बाहेरचे जेवण टाळावे, अनुवंशिक आजार असल्यास तत्काळ तपासणी करावी, जेवढ्या लवकर निदान कराल तेवढी पुढे गुंतागुंत होणार नाही. ठरावीक आहार देऊन व्यायाम करून घ्यावा.

बालकांना फास्टफूड, बाहेरचे जेवणे देणे टाळावे. तसेच बाळ वारंवार लघवी करीत असेल, अचानक वजन कमी होत असेल, तर बालकाला डॉक्टरांना दाखवावे. अनुवंशिकता असल्यास बालकांना हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- डॉ. दीपक जैन, बालरोगतज्ज्ञ

लहान मुलांना टाइप १ डायबिटीज हा आजार शक्यतो होत नाही. मोठ्या मुलांना आजार होऊ शकतो; परंतु बालकांना काही आजार असेल, वारंवार लघवी करीत असेल, तर डॉक्टरांना दाखवावे. त्यानंतरच निदान होईल.

- डॉ. रणजित शाह, बालरोगतज्ज्ञ