दहावी-बारावीच्या परीक्षा अर्जात बदल; १५ सप्टेंबरपासून संकेतस्थळावर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 03:30 AM2017-09-10T03:30:51+5:302017-09-10T03:31:35+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये दहावी-बारावीच्या होणाºया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये दहावी-बारावीच्या होणाºया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बदललेले अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून यादी पाहून विद्यार्थ्यांच्या अर्जात बदल करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
अर्ज भरण्यास १५ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात येत आहे. अर्जातील बदल मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. अर्ज डाऊनलोड करून विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांची माहिती शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयाने जनरल रजिस्टरमधून पडताळणी करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्या वेळी याचा फायदा होणार आहे. एकावेळी सर्व जण संकेतस्थळावर गेल्यास तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शाळांना सूचना दिल्या आहेत.
हे लक्षात ठेवा
विद्यार्थ्याच्या नावाचे अचूक स्पेलिंग, जन्मदिनांक, आईचे नाव, जन्मस्थळ, परीक्षेस घ्यायचे विषय, परीक्षेचे माध्यम, आधार क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, सहीच्या इमेजेस, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कला, चित्रकला, लोककला, क्रीडा सवलतीचे गुण मिळवण्यासाठी अर्ज करणार आहे की नाही, कसा याचा उल्लेख अर्जात करणे आवश्यक आहे.