बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईत ‘चेंज ऑफ गार्ड’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:50 AM2020-02-19T03:50:51+5:302020-02-19T03:51:23+5:30

गृहमंत्री देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट दिली

'Change of Guard' in Mumbai on the grounds of Buckingham Palace | बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईत ‘चेंज ऑफ गार्ड’

बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईत ‘चेंज ऑफ गार्ड’

googlenewsNext

मुंबई : लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज आॅफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ‘युनायटेड किंगडम’च्या राजघराण्याचा राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षारक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज आॅफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवड्यातील ठराविक दिवशी होणारे हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्थानिक जनतेसह जगभरातील पर्यटक उपस्थित राहतात. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक पोलीस महासंचालक कार्यालय येथे झाल्यास हे येथील नागरिकांसह मुंबईस भेट देण्यासाठी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल.

गृहमंत्री देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १ मेपासून दर रविवारी ‘चेंज आॅफ गार्ड’ पोलीस मुख्यालयासमोरील प्रांगणात आयोजित केले जाणार आहे. एका पाळीतील सुरक्षारक्षक आपला कार्यभार दुसºया पाळीतील सुरक्षारक्षकांकडे सोपवितात अशी ‘चेंज आॅफ गार्ड’ची संकल्पना आहे. हे होत असतानाचे पोलीस बँडची धून तसेच आकर्षक परेडचे दर्शन आता मुंबईकरांना घडणार आहे.

शहीद जवानांच्या सन्मानार्थ पोलीस मुख्यालयात ‘शहीद गॅलरी’(मार्टिर्स गॅलरी) स्थापन करण्यात येणार आहे.

Web Title: 'Change of Guard' in Mumbai on the grounds of Buckingham Palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.