मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल, अवजड वाहनाना बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:42 AM2023-09-27T11:42:24+5:302023-09-27T11:43:06+5:30

विसर्जन सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.

Change in road traffic on the occasion of Anant Chaturdashi in Mumbai ban on heavy vehicles | मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल, अवजड वाहनाना बंदी!

मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल, अवजड वाहनाना बंदी!

googlenewsNext

मुंबई :

विसर्जन सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. मुंबईत १३ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, ७० हजारांहून  अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. 

नैसर्गिक विसर्जनस्थळी तसेच कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पालिकेने विसर्जनाची तयारी केली आहे. वाहतूक पोलिसांनी गिरगाव, दादर, जुहू, मालाड, मालवणी टी जंक्शन आणि गणेशघाट पवई यासारख्या महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोणते रस्ते बंद असतील?
नाथालाल पारेख मार्ग, जे एस एस रोड, विठ्ठलभाई पटेल बाबासाहेब जयकर मार्ग, कावसजी पटेल मार्ग, टँक रोड, नानूभाई देसाई रोड, पीडी मेलो रोड, दादासाहेब भडमकर मार्ग,  सँडहर्स्ट रोडचा मार्ग,  एन. ए. पुरंदरे मार्ग ते ह्युजेस रोड, एलबीएस रोड, साकीविहार रोड मार्ग. 

Web Title: Change in road traffic on the occasion of Anant Chaturdashi in Mumbai ban on heavy vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई