Join us

साकीनाका बलात्कार प्रकरणातील सरकारी वकील बदला; पीडितेच्या कुटुंबियांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:48 PM

ऍट्रोसिटी ऍक्ट व संवेदनशील प्रकरणांचा अभ्यास असलेले नितीन सातपुते यांची नियुक्ती करण्याची मागणी

मुंबई-१५-(प्रतिनिधी )-मुंबईसह राज्यभर खळबळ उडालेल्या साकीनाका पिडीत प्रकरणात राज्य सरकारमार्फत नेमलेल्या सरकारी वकिलावर पिडीतेच्या कुटुंबाने आक्षेप घेतला आहे. ऍट्रोसिटी ऍक्ट व संवेदनशील प्रकरणांचा अभ्यास असलेले नितीन सातपुते यांची या प्रकरणात  विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या पीडितेच्या कुटुंबात तिच्या दोन लहान मुली, आई व तिची बहिण आहे . साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ९ सप्टेबर रोजी पिडीत महिलेची बलात्कार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली , या घटनेचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. राज्य  सरकारनेव पोलिसांनी  या प्रकरणात समाधानकारक भूमिका घेत  घेतलेल्या आम्हाला न्याय देत आहेत याबद्दल मला समाधान आहे. परंतु सदर खटला चालविण्यासाठी सरकारने राजा ठाकरे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबद्दलची नाराजी पिडीतेच्या कुटुंबातील एकमेव जबाबदार असलेल्या आईने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पाठविलेल्या  पत्रात व्यक्त केली आहे.हा खटला न्यायालयात चालविण्यासाठी यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अशी प्रकरणे हाताळणाऱ्या तज्ञ वकिलांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. नितीन सातपुते हे समाजातील सुप्रसिद्ध  वकील असून त्यांनी  महाराष्ट्रातील अनेक प्रकरणे मार्गी लावलेली आहेत त्यांचा या विषयावरील गाढा अभ्यास आहे तरीही आपण   नितीन सातपुते यांची या खटल्यात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी विनंती पीडितेच्या आईने केली आहे .भीम आर्मी संघटनेचीही ठाकरे यांच्या वर नाराजीदरम्यान या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेल्या भीम आर्मी  या सामाजिक संघटनेने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . भीम आर्मीच्या  शिष्टमंडळाने आज मुंबईचे पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन सरकारी वकील राजा ठाकरे यांना बदलण्याची मागणी केली. ठाकरे यांच्या ऐवजी ऍट्रोसिटी ऍक्ट व संवेदनशील प्रकरणांचा अभ्यास असलेले सुप्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांना  या प्रकरणात  विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावे अशी मागणी अशोक कांबळे, रमेश बालेश, योगीनीताई पगारे, अविनाश समींदर, अब्दुल सत्तार भाई, रौफ भाई, संजय शिरसाठ, जे. पी.वाल्मिकी आदी पदाधिकाऱ्यांनी  यावेळी केली. दरम्यान याच मागणीचे पत्र भीम आर्मीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनादेखील दिले आहे .

टॅग्स :साकीनाका