गोंधळ टाळण्यासाठी वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:07 AM2017-11-25T06:07:41+5:302017-11-25T06:07:52+5:30

मुंबई विद्यापीठात निकालाचा गोंधळ सावरत असतानाच हिवाळी परीक्षाही घेतल्या जात आहेत.

Change in scheduling to avoid confusion | गोंधळ टाळण्यासाठी वेळापत्रकात बदल

गोंधळ टाळण्यासाठी वेळापत्रकात बदल

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठात निकालाचा गोंधळ सावरत असतानाच हिवाळी परीक्षाही घेतल्या जात आहेत. परीक्षांमधील गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठातर्फे विशेष काळजी घेतली जात आहे. परीक्षांमधील संभाव्य आसनव्यवस्थेतील गोंधळ टाळण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, २८ नोव्हेंबरची परीक्षा पुढे ढकलली आहे.
आधीच्या वेळापत्रकानुसार २८ नोव्हेंबरला तृतीय वर्ष कला शाखेचा अप्लाइड कोम्पोनंट ग्रुप - पेपर एकचा एक्स्पोर्ट मार्केटिंग आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटचा पेपर होता. शिवाय याच दिवशी बीकॉमच्या पाचव्या सत्राचादेखील पेपर होता. यंदा होणाºया बीकॉमच्या परीक्षेला तब्बल ७८ हजार ३५३ विद्यार्थी बसले असून, २६३ केंद्रांवर परीक्षा घेतल्या जात आहेत. एकाच वेळी इतक्या परीक्षा असल्याने आसनव्यवस्थेत गोंधळ होऊ शकतो. हे लक्षात घेऊन अप्लाइड कोम्पोनंट ग्रुप- पेपर एक - एक्सपोर्ट मार्केटिंग आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट या परीक्षा आता २ डिसेंबरला घेण्यात येतील. या दोन्ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी दीडच्या दरम्यान होतील.

Web Title: Change in scheduling to avoid confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.